शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

‘प्लानिंग’चे ‘गुगल प्रेम’ सिडकोच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:27 IST

सिडकोचा ‘प्लानिंग’ अर्थात ‘नियोजन’ हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे.

कमलाकर कांबळे ।नवी मुंबई : सिडकोचा ‘प्लानिंग’ अर्थात ‘नियोजन’ हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून नियोजित केलेल्या भूखंडांची निविदा काढून विक्री केली जाते. त्यामुळे या भूखंडांचे योग्य पद्धतीने सीमांकन करणे गरजेचे असते; परंतु निविदा प्रक्रियेसाठी या विभागाकडून ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने भूखंडांचे छायाचित्र घेऊन ते मार्केटिंग विभागाकडे प्रस्तावित केले जात असल्याचे समजते; परंतु ही प्रक्रिया सदोष असल्याने प्लानिंग विभागाचे हे ‘गुगल प्रेम’ सिडकोच्या मुळावर बेतत आहे. कारण, पात्र निविदाधारक भूखंडासाठी भरलेले पैसे परत मागत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात एका विकासकाला ११५ कोटी रुपये परत करण्याची नामुष्की सिडकोला पत्करावी लागली आहे.सिडको हे राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात गृहनिर्मिती हा सिडकोचा मुख्य उद्देश होता; परंतु कालांतराने या उद्देशाला बगल देत, सिडकोने भूखंड विक्रीचा मार्ग अवलंबिला. यातच शहरातील भूखंडांच्या किमती गगनाला भिडल्याने तयार घरांपेक्षा मोकळ्या भूखंडांना मागणी वाढली. त्यामुळे सिडकोने बोली पद्धतीने अर्थात निविदा काढून उपलब्ध भूखंडांच्या विक्रीचा धडाका लावला. या सर्व प्रक्रियेत सिडकोचा प्लानिंग अर्थात नियोजन विभागाची मध्यवर्ती व तितकीच महत्त्वाची भूमिका राहिली. सुरुवातीच्या काळात निविदा प्रक्रियेसाठी प्रस्तावित करण्यात येणाºया भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे सीमांकन व क्षेत्रफळ निश्चित केले जात असे. त्यामुळे पात्र निविदाधारकाला भूखंडाचा ताबा घेताना फारसे कष्ट करावे लागत नसत. मात्र, सध्या सिडकोकडील विक्रीयोग्य उपलब्ध भूखंडांची संख्या मर्यादित राहिली आहे. त्यामुळे नियोजन विभागाचे कामही मंदावले आहे. किंबहुना या विभागाला मरगळ चढली आहे. याचा परिणाम म्हणून फिल्ड वर्कला फाटा देत भूखंडांच्या सर्वेक्षणासाठी ‘गुगल अर्थ’चा अवलंब केला जात आहे. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने सिडकोला फटका बसत आहे.सिडकोने काही महिन्यांपूर्वी सानपाडा येथील सुमारे सात हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांची निविदा काढून विक्री केली. एनएमएस डेव्हलपर्स या कंपनीने हा भूखंड घेतला होता. नियमानुसार अ‍ॅग्रिमेंटपूर्वी भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. त्यानुसार संबंधित विकासक भूखंड पाहण्यासाठी गेले असता, त्यावर महावितरणचा डीपी बॉक्स असल्याचे दिसल्याने त्यांनी हा भूखंड घेण्यास नकार दिला. त्यामुळे गोंधळलेल्या नियोजन विभागाने या भूखंडांचे नव्याने सीमांकन केले; परंतु त्यावरही १५ ते २0 जुने वृक्ष असल्याने विकासकाने तो घेण्यास नकार दर्शविला. सिडकोने ही झाडे तोडण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली; परंतु महापालिकेने झाडे तोडण्यास परवानगी नाकारल्याने एनएमएस डेव्हलपर्सने भूखंडांसाठी भरलेले ११५ कोटी रुपये परत देण्याची मागणी केली. त्यानुसार ही रक्कम संबंधित विकासकाला परत करण्याची नामुष्की सिडकोवर ओढावली आहे. याअगोदर नीलकंठ बिल्डर्सने अशाच कारणांमुळे घणसोली येथील भूखंड सिडकोला परत केला होता. तर एल. के. अर्थ डेव्हलपर्सने अतिक्रमण व न्यायालयीन दाव्यामुळे घणसोलीतील ९00 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड घेण्यास नकार दर्शविल्याची माहिती सूत्राने दिली. एकूणच नियोजन विभागाच्या गलथान कारभारामुळे सिडकोला नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने यासंदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी विकासकांकडून केली जात आहे.>समन्वयाचा अभावभूखंडांचे वाटप किंवा विक्री करण्याच्या प्रक्रियेत सिडकोच्या प्लानिंग आणि मार्केटिंग विभागाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, या दोन विभागांत परस्पर समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. प्लानिंगकडून विक्रीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भूखंडांचे कोणत्याही प्रकारे पुनर्परीक्षण न करता, मार्केटिंग विभागाकडून त्याच्या निविदा काढल्या जातात. विशेष म्हणजे, पात्र ठरलेल्या निविदाधारकाला पाच ते सहा महिन्यांनंतर भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. तोपर्यंत निविदाधारकाने सर्व पैशांचा भरणा केलेला असतो.>साडेबारा टक्के भूखंड योजनेला फटकाप्लानिंग विभागाकडून विविध प्रयोजनासाठी भूखंडांचे नियोजन केले जाते. निविदा आणि साडेबारा टक्के योजनेचे भूखंडही याच विभागाकडून प्रस्तावित केले जातात. त्यासाठी भूखंडांचे फिजिकल डिमार्केशन करणे गरजेचे असते; परंतु या विभागाकडून साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे सीमांकनसुद्धा ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून, अनेक प्रकल्पग्रस्तांना सीआरझेडमध्ये भूखंड प्रस्तावित करण्यात आले आहेत. बांधकामनिषिद्ध असलेल्या अशा क्षेत्रातील भूखंडांचे वाटप रद्द करण्याची पाळी सिडकोवर ओढावली आहे.