शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 09:26 IST

Navi Mumbai News: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यात लवकरच शुभारंभ होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळावरील टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या मार्गात उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह विविध स्वरूपाच्या २२५ अडथळ्यांची नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअर मन’ यादी डीजीसीएच्या सूचनेनुसार जाहीर झाली होती. ही अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको, नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. प्राणी कत्तलीची तक्रार नॅट कनेक्ट फांउडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

मे महिन्यात ‘नोटोम’लिस्टनुसार नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील २२५ अडथळे डीजीसीएने दूर करण्यास सांगितले होते. या अडथळ्यांचा मार्च २०२५ मध्ये विमानतळाचा समावेश भारताच्या एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) मध्ये केला होता. सुरक्षित विमान वाहतूक,  संचलनासाठी आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्यांचा तपशील एआयपी नोंदीमध्ये दिला होता. यात धावपट्टीची लांबी, विमान पार्किंग, इंधन उपलब्धतासारख्या पायाभूत सुविधांचा उल्लेख असला, तरी विमानतळाजवळील २२५ संभाव्य अडथळ्यांचा मुद्दा होता.

यातील किती  अडथळे दूर झालेत, हे गुलदस्त्यात असले तरी विमानतळ कंपनी आणि सिडकोने याबाबत कार्यवाही सुरू केली. यानुसारच अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने उलवे, द्रोणागिरी, बेलापूर ते नेरूळ-सीवूड परिसरातील सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. टेरेसवरील मोबाइल टॉवर्स, पाण्याच्या टाक्यांसह इतर उंच अडथळू दूर करण्यास सांगितले आहे. एआयपीने २२५ अडथळे सांगितले तरी यात मोठे अडथळे जास्त नाहीत, असे अधिकाऱ्याने नाव न सांगता सांगितले.

असे आहेत २२५ अडथळेयामध्ये ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स, १२ मोबाइल टॉवर्स, ८ फ्लडलाइट पोल यांचा समावेश होता. विमानांच्या सुरक्षित हालचालींसाठी हे अडथळे दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई