शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:38 IST

खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते.

पनवेल  - खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते. थेट मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणी चौकशी समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले असून खारघरमधील रहिवासी संदीप खाकसे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात २ मे रोजी जनहित याचिका दाखल केली आहे.सिडकोच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये जिल्हाधिकारी रायगड, पॅराडाईज ग्रुपचे मालक मनीष भतीजा, संजय भालेराव यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.खारघर शहरातील सेक्टर २३, २४, २५ मध्ये नियोजित २०० एकर जागेवर सिडकोने सेंट्रल पार्क उभारण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ हेक्टरवर सेंट्रल पार्क विकसित करण्यात आले. उर्वरित ५५ हेक्टरवर दुसरा टप्पा नियोजित असताना याठिकाणच्या सर्वे नंबर १८३ मधील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली. सुमारे २४.५ एकर जागा ९ शेतकऱ्यांनी एकाच बिल्डरला सुमारे १५ लाख प्रति एकर दराने देऊ केली. जमिनीचा भाव सुमारे कोट्यवधीच्या घरात असताना सिडकोने या व्यवहारात कोणताच हस्तक्षेप केला नाही.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टNavi Mumbaiनवी मुंबई