डोंबिवली : डुकर मारल्यामुळे कोपर येथील जगदीश पाटील यांनी तिघा जणांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी शहानिशा करून कनोजिया कुटुंबातील तिघांना अटक केली. ही घटना 6 डिसेंबर, शनिवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार कनोजिया कुटुंबातील तिघांनी म्हात्रे चाळीजवळ एका डुकराला सुरीने मारले. त्यामुळे त्रस्त झालेल्या पाटील यांनी असे कृत्य करण्यावरून संबंधित तिघांना अडवल़े
परंतु, त्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे पाटील यांनी तातडीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची चर्चा आहे. त्यानुसार त्या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)