शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:51 IST

आगीमध्ये जेल फार्मास्युटिकल्स कंपनीला लागूनच असलेल्या इतरही दोन कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. परंतु आग इतरत्र पसरणार नाही याची खबरदारी अग्निशमन दलाने घेतली.

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमधील जेल फार्मास्युटिकल्स या सुगंधी तेल, अगरबत्ती, शोभेच्या मेणबत्ती आदी सुगंधी उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्याला गुरुवारी रात्री १ वाजता  भीषण आग लागली. यामध्ये कारखाना जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण स्पष्ट नाही.

कारखान्याच्या आत सुरुवातीला लागलेली छोटी आग विझविण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, ती आटोक्यात न आल्याने रात्रपाळीत काम करणाऱ्या सुमारे ७० हून अधिक कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. रबाळे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनी पेट घेतल्याने तासाभरातच सुमारे ३ हजार मीटर क्षेत्रफळाच्या संपूर्ण कारखान्यात आग पसरली. त्यात हजारो लिटरचा मेन व रसायनांचा साठा असलेल्या पाचही टँक पेटू लागले. 

दोन कंपन्यांना होता धोका : आगीमध्ये जेल फार्मास्युटिकल्स कंपनीला लागूनच असलेल्या इतरही दोन कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. परंतु आग इतरत्र पसरणार नाही याची खबरदारी अग्निशमन दलाने घेतली. त्यातूनही बाजूलाच असलेल्या डोल इंजिनिअर्स कंपनीच्या काही भागात आग पसरल्याने त्यांचेही नुकसान झाले. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे वीस तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी एमआयडीसीसोबतच नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे, ऐरोली व वाशी येथील अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते. दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rabale Fragrance Factory Gutted in Fire; 70 Workers Escape

Web Summary : A major fire engulfed a fragrance factory in Rabale MIDC, Navi Mumbai, destroying it. Around 70 workers escaped unharmed. The fire, suspected to have started small, quickly spread due to flammable materials, also damaging a neighboring company. Firefighters battled the blaze for twenty hours.
टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल