शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

By नामदेव मोरे | Updated: December 14, 2022 08:57 IST

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो.

- नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपूल व तुर्भे पुलाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, प्रतिदिन एक लाख वाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. वाशी टोलनाका परिसरात नियमित चक्का जाम होत आहे. तुर्भेमध्ये वाहतूक बदलाचे सूचना फलकच नसल्यामुळे वाहतूकदारांना ठाणे-बेलापूर रोडवर पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशालाही कात्री लागत असून, उड्डाणपुलांचे काम कधी पूर्ण होणार?, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. या मार्गावरून प्रतिदिन ८० हजार ते १ लाख वाहनांची ये-जा सुरू असते. या रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासनाने वाशी खाडीपुलावर ऑक्टोबर २०२० पासून तिसरा पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. जवळपास ७७५ कोटी रुपये खर्च करून १२.७० मीटर रुंद व १८३७ मीटर लांबीच्या या पुलाचे काम नाेव्हेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, ते पूर्ण होण्यास २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाशी गाव ते टोल नाका व नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर टोल नाका ते खाडीपुलाच्या मध्यापर्यंत रोज वाहतूककोंडी होत आहे. जवळपास ८५० मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटांऐवजी १५ ते ३० मिनिटे वेळ घालवावा लागत आहे.

वाशी खाडीपुलाप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे पुलाच्या विस्तारीकरणाचे कामही रखडले आहे. २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले आहे. जुलै २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप रेल्वे मार्गिकेवरील गर्डर टाकायचे काम सुरू आहे. या पुलावरून ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे नाक्याकडे जाणारी मार्गिका तोडण्यात आली आहे. याविषयी योग्य सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक वाहतूकदारांना शिरवणे व नेरूळवरून वळसा घालून यावे लागत आहे. सानपाडावरून रिक्षाने व टॅक्सीने एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी