शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:46 IST

आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती.

नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची आॅनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार की नाहीत, याबाबत पालक चिंतेत आहेत.आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आॅनलाइन शिक्षण शाळा आणि महाविद्यालयांचे सुरू आहे, परंतु आरटीईच्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने, या निवड यादीतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्या माध्यमातून १७ जून, २०२० रोजी निवड यादीतील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबत कार्यवाही करण्याची प्राथमिक जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आल्याचे पत्र देण्यात आले होते, परंतु शाळांच्या माध्यमातून अद्याप निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिकेने सदर प्रकियेला गती देण्याची मागणी केली जात आहे.प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळेकडून घेणारआरटीईच्या अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये असून, महापालिकेने या प्रक्रियाला गती देऊन या प्रक्रियेतील सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत.- जयंत म्हात्रे, पालक, नेरुळनिवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शाळा प्रशासनांना करण्यात आल्या होत्या. या उपक्रमांतर्गत शहरात १०५ शाळा असून, प्रवेशाबाबत त्यांच्याकडून अपडेट घेतले जात आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी निवड यादीतील किती विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, याची माहिती शाळांकडून घेत आहे.- योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी न.मुं.म.पा.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाNavi Mumbaiनवी मुंबई