शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांची धडक, दिल्लीतील घटनेचे पडसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 07:12 IST

दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची मागणी केली.

नवी मुंबई : दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवदेन देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्याची मागणी केली.दिल्लीतील रायन इंटरनॅशनल शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जीमुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. अशीच घटना इतर शाळांमध्येही घडू शकते, अशी शक्यता पालकांकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेबाहेर पालकांनी मोठ्या संख्येने जमाव जमवून व्यवस्थापनाला धारेवर धरले. शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यासंबंधी पालकांनी अनेकदा व्यवस्थापनाकडे मागणीही केलेली आहे. शाळेत सीसीटीव्ही बसवावेत, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया बसचे चालक प्रशिक्षित असावे, बस पार्किंगची व्यवस्था असावी, अशा पालकांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र, शाळेतील सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत असून, ते सुरू करण्याची मागणी करणाºया पालकांवर व्यवस्थापनाकडून दडपण आणले जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे.अखेर दिल्लीतल्या घटनेनंतर चिंतित झालेल्या पालकांनी मंगळवारी सकाळी शाळेबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमवला होता. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सानपाडा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.या वेळी पालकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी बाहेर येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली; परंतु जमलेली गर्दी पालकांची नसून राजकीय कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप करत त्यांची भेट घेण्याचे मुख्याध्यापकांनी टाळले. यामुळे जमाव अधिक संतप्त झाल्याने वरिष्ठ निरीक्षक सूरज पाडवी यांच्या मध्यस्थीनंतर मुख्याध्यापकांनी पालकांसोबतचर्चा केली. या वेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळेत असलेल्या त्रुटींमध्ये सुधार करण्याचे आश्वासन दिले.पालकांनी मागणी करूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत शाळा व्यवस्थापन हलगर्जीपणा करत आहे. यामुळे दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली. या वेळी पालकांनी दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांनुसार शाळेत सुधार केला जाईल, असे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिल्याचे पालक प्रतिनिधी मिलिंद सूर्याराव यांनी सांगितले.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलSchoolशाळा