शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

एनएमएमटीच्या बसेसवर पनवेलकरांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:32 IST

निवडणुकीअगोदर पनवेलकरांना स्वतंत्र परिवहन सेवेची प्रलोभने देणाºया सत्ताधाºयांना आता त्याचा विसर पडला आहे. प्रशासनानेही तूर्तास स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : निवडणुकीअगोदर पनवेलकरांना स्वतंत्र परिवहन सेवेची प्रलोभने देणाºया सत्ताधाºयांना आता त्याचा विसर पडला आहे. प्रशासनानेही तूर्तास स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे पनवेलकरांना पुढील काही वर्षे एनएमएमटी आणि इतर शहराच्या परिवहन सेवेच्या बसेसवर विसंबून राहावे लागणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा नैना प्रकल्प, मेट्रो आदीमुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात या क्षेत्रात विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी आपले लक्ष पनवेल परिसरावर केंद्रित केले आहे. त्यामुळे या परिसरात नवनवीन गृहप्रकल्पांचे पेव फुटले आहे. या क्षेत्रात सर्वसामान्यांच्या बजेटमधील घरे तयार होत असल्याने चाकरमान्यांचा ओढा आता पनवेलकडे वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणून पनवेल शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडू लागला आहे. विशेषत: परिवहनसारख्या सेवेची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २0१५ मध्ये नगर परिषदेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली होती. निधीसाठी जेएनएनयूआरएमकडे प्रस्तावही पाठविण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर वाहननिर्मिती कंपनीला १00 बसेसची आॅर्डरही देऊन टाकली होती. परंतु याच काळात केंद्राने जेएनएनयूआरएम ही योजना बंद केल्याने परिवहन सेवा सुरू करण्याच्या नगर परिषदेच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. परंतु याच दरम्यान म्हणजेच आॅक्टोबर २0१६ मध्ये पनवेल महापालिकेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र परिवहन सेवेच्या विषयाला काहीशी बगल मिळाली. असे असले तरी अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात परिवहन सेवेला आग्रस्थान दिले होते. त्यामुळे याबाबत पनवेलकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु सध्याच्या स्थितीत परिवहन सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने पनवेलकरांची पुन्हा निराशा झाली आहे.पनवेल क्षेत्रात सध्या एनएमएमटीच्या बसेस धावतात. एनएमएमटीच्या आसुडगाव येथील डेपोमधून पनवेल परिसरात १५ मार्गांवर बसेस धावतात. तर दोन दिवसांपूर्वी आणखी दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तथापि आणखी सहा मार्ग सुरू करण्याची पनवेल महापालिकेची मागणी आहे. परंतु एनएमएमटीकडे पुरेशा बसेस नसल्यामुळे आणखी मार्ग सुरू करणे शक्य नसल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी स्पष्ट केले आहे.वचननामा कागदावरचमागील दहा वर्षांत पनवेलमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीच्या वचननाम्यात परिवहन सेवेचा मुद्दा प्रमुख राहिला आहे.\राज्यात सुरू असलेल्या विविध परिवहन सेवांची अवस्था ठीक नाही. त्यामुळे राज्य सरकारने आहे त्याच परिस्थितीत जुळवून घेण्याचे निर्देश महापालिका व नगरपालिकांना दिले आहेत. असे असले तरी एमएमआरडीएमार्फत यासंदर्भात वेगळ्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य होईल.- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्त, पनवेल महापालिका