शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:27 IST

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी पत्राद्वारे त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे.

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे . आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपाल द्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगर पालिकेला पाठविण्यात आले आहे . यासंदर्भात आयुक्त शिंदे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे .     तुम्ही मग्रुरीने पालिकेचा कारभार हाकत आहात . हे कुठेतरी थांबायला हवे आहे . अनेक वेळा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष भेटून तुम्हाला याबाबत कल्पना देऊन देखील तुमच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नसल्याने तुम्हाला संपविण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही . तुम्ही वारंवार नगरसेवकांच्या अधिकारांवर घाला घालत आहात . तुम्ही असेस वागलात तर मी तुमच्या चेह-यावर काळे फासेन ,  तुमच्या चारित्र्यावर डाग लावीन . आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लावलेली आहे . या पत्रानंतर व्यवस्थित वागल्यास आम्ही हे सर्व थांबवू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे . तुम्ही ज्या नागरिकांना खूष करण्यासाठी हे सर्व परदर्शक कारभार करता त्या नागरिकांना आम्ही मतदानावेळी तीन हजार रुपये देऊन नगरसेवक म्हणून निवडून आले आहोत . तुमच्यावर अॅट्रोसिटी दाखल करू असेही या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे . आमच्या मर्जीतील कंत्राटदार पालिकेत नेमा . त्याला प्रत्येक महिन्याला आम्हाला भेटायला सांगा तसेच तुम्ही पैसे खात नाही पण आम्ही लागतात असे या धामकिवजा पत्रात नमूद करण्यात आले आहे .     पालिकेतील उपायुक्त सध्या बावनकुळे व जमीर लेंगरेकर यांना देखील उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे .तुमच्या मुळेच हे अधिकारी नागरसेवकांशी मग्रुरीने वागत आहेत . व स्वतःला मुख्यमंत्री असल्याचे समजत आहेत . आयुक्त शिंदे यांनी मला हे पत्र सोमवारी प्राप्त झाले असल्याचे सांगितले . मी माझं वयक्तिक काम करीत नसून जनतेचीच काम करीत आहे . आयुक्त पदापेक्षा संवेदनशील असलेल्या पदांवर मी काम केले आहे . या पत्राला न घाबरता मी अजून जोमाने कामाला लागेन असेही शिंदे यांनी स्पष्ट केले . 

-  मागील अनेक दिवसापासून पनवेल महानगर पालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवक व आयुक्त शिंदे यांच्यात वाद पेटला आहे . आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक खुलेआम करीत आहेत . नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधात  अॅट्रोसिटी , अविश्वास ठराव आनण्यासंदर्भात उघडपणे चर्चा करण्यात आली होती .त्यामुळे पत्र पाठवणा-यांने मुद्दामून अनेक गोष्टी या पत्रात नमूद केल्या आहेत .  यासंदर्भात तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे . दि. २३ रोजी हे पत्र पनवेल महानगर पालिकेला प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा