शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक बंदी कागदावरच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:30 IST

पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणावर आघात करणा-या प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी पालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी केली.

वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणावर आघात करणा-या प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी पालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी केली. विशेष म्हणजे, अशाप्रकारे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी राज्यातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान पनवेल महानगरपालिकेने मिळविला. प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदार, फेरीवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवत तीन टनांपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची मोहीम थंडावल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत आहे.२ आॅक्टोबर रोजी पालिकेने किरकोळ व्यापाºयांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली. विशेष म्हणजे, राज्यभर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी असताना, पनवेल महानगरपालिकेने सर्वच प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी घातल्याने अशाप्रकारे बंदी घालणारी राज्यातील पनवेल महानगरपालिका पहिलीच महानगरपालिका असल्याचा दावा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, डिसेंबर महिन्यात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदार, फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम थंडावल्याने सर्वत्र सर्रास विक्री सुरू आहे.>घरोघरी कापडी पिशवी वितरित कधी होणार -प्लास्टिक पिशव्यांवर बंदीनंतर घरोघरी कापडी पिशव्या वाटप केल्या जातील, असे पालिकेने सांगितले होते. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनीही अशाप्रकारे घरोघरी प्लास्टिक पिशव्या वितरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, बंदीनंतर तीन महिने उलटूनही अद्याप घरोघरी कापडी पिशव्या वितरित करण्यात आलेल्या नाहीत.<पालिकेच्या मार्फत प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले गेले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.>पाळेमुळे भिवंडी-उल्हासनगरात :५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूनही अशा पिशव्यांची निर्मिती केली जाते. भिवंडी, उल्हासनगरात अशा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचे अनधिकृत कारखाने असल्याने या ठिकाणाहून पनवेलमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री केली जात आहे.>पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विभागीय अधीक्षकांवर कारवाईची जबाबदारी देऊन पालिका प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र, दुकानदार, फेरीवाल्यांचे यामुळे चांगलेच फावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कारवाईकरिता सक्षम यंत्रणा नसल्याने पालिकेच्या प्लास्टिकबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.>सर्वप्रथम नागरिकांनी दुकानदारांकडून पिशव्या खरेदी करणे बंद केले पाहिजे. मनुष्यबळ कमी असल्याने प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करीत वेगळे पथक नेमले नाही. प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असेल, तर पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.- संध्या बावनकुळे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका>शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरू आहे. दुकानदारांना पालिकेची भीती राहिली नाही. नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता, पालिकेने प्लास्टिक पिशव्या जप्तीचीमोहीम जोरदारपणे राबविण्याची गरज आहे.-वैशाली ठाकूर,रहिवासी, मुर्बीगाव, खारघर>पनवेल महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय चांगला घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य दिशेने होताना दिसून येत नाही. पालिका हद्दीत दाखल होणाºया पिशव्या कोणाच्या मार्फत या ठिकाणी पुरविल्या जातात, त्यांच्यावरही कारवाई केल्यास पालिका हद्दीत प्लास्टिक विक्री होणार नाही.- बीना गोगरी, अध्यक्ष, शाश्वत फाउंडेशन

टॅग्स :vegetableभाज्या