शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

वर्षभरापासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पनवेलकरांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 01:44 IST

आॅक्टोबर २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभराचा काळ लोटता आला तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही.

- वैभव गायकरपनवेल : महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती मृत्यूने पनवेल शहर हादरले. या घटनेला वाहनचालकाबरोबरच परिसरातील रस्त्यांची कामे करणारा ठेकेदारही जबाबदार आहे. वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. नगरसेविकेचा बळी रस्त्यानेच घेतल्याने या घटनेचे पडसाद शहरात उमटत आहेत. रस्त्याचे काम महापालिकेने दिवाळीपूर्वी न केल्यास परिसरातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आॅक्टोबर २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभराचा काळ लोटता आला तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. यासंदर्भात कफचे अरुण भिसे यांनी पालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. रस्त्याचे काम बिटकॉन या कंपनीला देण्यात आले आहे. रस्त्यालगत गटारांची कामेही अपूर्ण असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात असलेल्या मुनोत रेसिडेन्सी, श्रीजी सोसायटी, श्रेयश सोसायटी आदी सोसायटींमधील रहिवाशांना या ठिकाणाहून नियमित ये-जा करावी लागते. संपूर्ण पावसाळा लोटला तरीदेखील कामामध्ये काहीच सुधारणा होत नाही. तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबले असल्याचे बोलले जात असून या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात बिटकॉन कंत्राटदाराने कोणतीच खबरदारी घेतली नाही, यामुळेच आजवर अनेक नागरिक या ठिकाणी अपघातग्रस्त झाले आहेत. त्यातच पनवेल महापालिकेच्या नगरसेविकेलाही जीव गमवावा लागला आहे. वर्षभरापासून रखडलेले काम त्वरित पूर्ण करा, अन्यथा येऊ घातलेल्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.ठेकेदाराला काळ्या यादीत टाकारस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने वर्षभरापासून अक्षरश: पसारा घातला आहे. कोणतीही सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी राबविली नसताना ये-जा करणाºया रहिवाशांचा जीव टांगणीला आहे. त्यामुळे कंत्राटदाराला पालिकेने त्वरित काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कफ संस्थेचे अरुण भिसे यांनी व्यक्त केला आहे.वर्षभरापासून रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे विविध समस्यांना तोंड देत आहोत. प्रशासन व कंत्राटदारांच्या गलथान कारभाराचा फटका एका नागरसेविकेला जीव गमावून द्यावा लागत असेल तर सर्वसामान्यांचे काय? संबंधित काम दिवाळीपूर्वी पूर्ण न झाल्यास २१ रोजीच्या विधानसभा मतदानावर आमचा बहिष्कार असेल.- भूपेश जावळे, रहिवासी, पनवेलकंत्राटदाराला संबंधित जागेवर सुरक्षा यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले आहेत. कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त,पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल