शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

शहरात १०९७ शाळाबाह्य मुले

By admin | Updated: July 7, 2015 02:16 IST

महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. घणसोली परिसरात सर्वाधिक १८२ विद्यार्थी आढळून आले आहेत.

नवी मुंबई : महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. घणसोली परिसरात सर्वाधिक १८२ विद्यार्थी आढळून आले आहेत. ८८ विशेष मुलेही सर्वेक्षणात आढळली आहेत. या सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता महाराष्ट्र शासनाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. याप्रमाणे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहरात सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी ४४५० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रगणकांवर लक्ष देण्यासाठी १०४ पर्यवेक्षक, ११ क्षेत्रीय अधिकारी व ५ भरारी पथकांची नियुक्ती केली होती. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात आली होती. २ जुलै रोजी शहरात रॅली काढण्यात आली होती. शनिवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ६ ते १० वर्षे वयोगटातील ३०६ मुले व ३३१ मुली आढळून आल्या आहेत. शाळा मध्येच सोडलेली २७६ मुले व १८४ मुली आढळून आल्या आहेत. एकूण १०९७ शाळाबाह्ण मुले आढळून आली आहेत. यामध्ये ८८ विशेष मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या शाळाबाह्ण बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेतले जाणार आहे. लवकरच महापालिका शाळांच्या केंद्रप्रमुखांची बैठक आयोजित केली जाणार आहे. शाळाबाह्ण मुले ज्या परिसरात आढळून आली त्याच परिसरात जवळच्या शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष मुलांना घरोघरी जावून शिकविण्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वेक्षण आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह महापौर सुधाकर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपआयुक्त अमरिष पटनिगिरे यांच्या नियंत्रणात पार पाडण्यात आली.