तळोजा : महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बेकायदा बांधकाम व फेरीवाले विरोधी कारवाईवर शहरातील राजकीय मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली आहे. या फेरीवाल्यांचे अगोदर पुनर्वसन करा, मगच कारवाई करा, असा पवित्रा शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. कळंबोली शहरातील फेरीवाल्यांचे काही महिन्यांपूर्वी सिडकोने सर्व्हे करून त्यांची नोंदणी केली होती. मात्र, पनवेल महानगरपालिकेने शहरातील फेरीवालामुक्त धोरण राबवत, सर्वप्रथम या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, मगच कारवाईचा बडगा उगारावा, असा पवित्रा राजकीय पक्षांनी घेतला आहे. यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे रवींद्र भगत, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष विजय खानावकर यांनी आयुक्तांना स्वतंत्र पत्र लिहून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांवरील कारवाईला विरोध
By admin | Updated: December 23, 2016 03:34 IST