शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

सिडकोतील क्रिस्टलच्या नोकरभरतीला विरोध

By admin | Updated: January 29, 2017 02:17 IST

तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरविण्यासाठी सिडकोने क्रिस्टल एजन्सीची नियुक्ती केली आहे. यापूर्वीच्या ३२० जणांवर अन्याय करून नवीन भरती केली जात असल्याने

नवी मुंबई : तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरविण्यासाठी सिडकोने क्रिस्टल एजन्सीची नियुक्ती केली आहे. यापूर्वीच्या ३२० जणांवर अन्याय करून नवीन भरती केली जात असल्याने कामगारांनी सीबीडीतील तारा सेंटरबाहेर आंदोलन करून भरती प्रक्रिया बंद पाडली. सिडकोने यापूर्वी अथर्व एजन्सीला मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका दिला होता. त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून जवळपास ३२० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत होते, पण संबंधित एजन्सीच्या कामाची मुदत जानेवारी अखेरीस संपत आहे. यामुळे क्रिस्टल कंपनीला मनुष्यबळ पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. ४३ क्लार्क व ३१ शिपाई १ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यासाठी संबंधित कंपनीने शनिवारी सीबीडी रेल्वे स्टेशनमधील तारा सेंटरमध्ये मुलाखती ठेवल्या होत्या. याविषयी माहिती मिळताच सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. नवीन ठेकेदाराने जुन्या कर्मचाऱ्यांनाच कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही तर भरती प्रक्रिया होवू दिली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. कामगार नेते श्याम म्हात्रे, काँगे्रस जिल्हा अध्यक्ष निशांत भगत, प्रभाकर जोशी व इतरांनी क्रिस्टलच्या व्यवस्थापनाची भेट घेतली. अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कामगारांना प्रथम नोकरीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली. पण संबंधित व्यवस्थापनाने १०८ जणांनाच भरती करण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. यामुळे त्या व्यतिरिक्त कोणालाही घेता येणार नसल्याचे सांगितले. परंतु सर्वांना कामावर घेतले नाही तर भरती प्रक्रिया पूर्ण होवू दिली जाणार नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. यामुळे भरती थांबविण्यात आली. यावेळी सर्व कामगारांनी तारा सेंटरबाहेर एकत्रित येवून न्याय देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)जुन्या एजन्सीच्या कामाची मुदत संपत आल्याने सिडकोने नवीन एजन्सी नेमली आहे. पण त्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नसल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. व्यवस्थापनाशी भेटून प्रथम जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, अन्यथा ही प्रक्रिया होवू न देण्याचा इशारा दिला. - श्याम म्हात्रे, कामगार नेते