शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मद्यविक्री केंद्राबाहेरचे पदपथ बनले ओपन बार, कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:04 IST

उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर तळीरामांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.केवळ महसूल मिळवण्याच्या हव्यासापोटी उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्री केंद्र चालकांना नियमांची पायमल्ली करण्यात सूट मिळत असल्याचे दिसून येत आहे. मद्यविक्री केंद्राच्या ठिकाणी बेधडकपणे नियमांची पायमल्ली होत असतानाही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. बारमध्ये बसून पिण्यावर होणारा पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मद्यविक्री केंद्र चालकांकडून ही शक्कल लढवली जात आहे. याकरिता स्थानिक राजकारण्यांसह पोलिसांना हाताशी धरून अर्थपूर्ण हितसंबंध जोपासले जात असल्याचाही आरोप होत आहे.कोपरी येथील सिग्नलपासून काही अंतरावरच असलेल्या मद्यविक्री केंद्राबाहेर तळीरामांची गर्दी झालेली असते. त्यांच्याकडून रस्त्यालगतच वाहने उभी करण्यात येत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या सदंर्भातील अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांकडून कारवाईकडे होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे. अशाच प्रकारे कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर पश्चिमेला बारच्या बाहेर रस्त्यावरच वाहने उभी करून मद्यपान केले जाते. यामुळेही त्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, त्यातून वाद उद्भवत आहेत. तर नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील अभुदय बँक लगत व स्थानकाच्या इमारतीमध्ये पश्चिमेकडील भागात आडोशाच्या जागी दिवस-रात्र उघड्यावर मद्यपान केले जाते. यामुळे त्या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर सीबीडी येथील प्रभात सेंटर इमारतीच्या तळाशी बोळामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ओपन बार चालत आहे.कायदा व सुव्यवस्थेला धोकाशहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवायांचा धडाका सुरू आहे. याकरिता अवैध मद्यवाहतूक, साठा करणाऱ्यांवर तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाया सुरू आहेत.उघड्यावर मद्यपान करणाºया व त्यांना मुभा देणाºया मद्यविक्रेत्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अशा ठिकाणी राजकीय वैमनस्यातून वाद उद्भवून कायदाव सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणहोऊ शकतो.मद्यविक्री केंद्रांना अभय : बहुतांश मद्यविक्री केंद्राचे मालक हे आजी-माजी पोलीस अधिकारी किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारण्यांशी संबंध असणाºयांचे आहेत. यामुळे सर्वांचीच मिलीभगत साध्य करून ठोस कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर एखाद्याने तक्रारीत सातत्य ठेवल्यास त्याच्यापुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी