शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

सिडकोच्या घरांसाठी आता केवळ एक हजार मुद्रांक शुल्क, राज्य सरकारचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 00:38 IST

CIDCO houses : सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी पंधरा हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. यात पात्र ठरलेल्या ग्राहकांकडून सिडकोच्या संबंधित विभागाकडून भरमसाट मुद्रांक शुल्क आकारले जात होते.

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने काढण्यात आलेल्या सोडतीत यशस्वी ठरलेल्या लाभधारकांना आता केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार सिडकोने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांची जवळपास १०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी पंधरा हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. यात पात्र ठरलेल्या ग्राहकांकडून सिडकोच्या संबंधित विभागाकडून भरमसाट मुद्रांक शुल्क आकारले जात होते. राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्राहकाकडून केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारले जावे, अशी मागणी विविध स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. म्हाडा व इतर शासकीय प्राधिकरणांकडून केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारले जात आहे. परंतु सिडकोकडून राज्य सरकारच्या आदेशाचे पालन होताना दिसत नव्हते. त्यामुळे सिडकोनेसुद्धा ग्राहकांकडून केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली होती. त्याची दखल घेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्र मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना पाठविण्यात आले आहे. सिडकोच्या या निर्णयाचा फायदा पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पातील ग्राहकांना होणार आहे. तसेच त्यानंतरच्या सोडतीत यशस्वी ठरलेले आणि सध्या प्रस्तावित असलेल्या ९० हजार घरांच्या लाभार्थ्यांना होणार आहे. दरम्यान, मनसेचे गजानन काळे यांनी सिडकोच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर सिडकोने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मनसेचे सचिव सचिन कदम यांनी म्हटले आहे.

६ नोव्हेंबरपर्यंत मुदत पंधरा हजार घरांच्या प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या लाभार्थ्यांना सिडकोने आणखी एक संधी देऊ केली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित ग्राहकांनी घर घेण्यास इच्छुक आहे की नाही हे कळविल्यास त्यांना पैसे भरण्यासाठी आणखी मुदत देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे. आतापर्यंत एकही हप्ता न भरलेल्यांची संख्या १,७२६ इतकी आहे

टॅग्स :cidcoसिडको