शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये डेंग्यूचा वर्षभरात फक्त एकच रुग्ण, साथीचे आजार झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:44 IST

Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून २६ जणांना मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्यविषयी जागरूकता वाढली आहे. शहरात वर्षभरात डेंग्यूचा फक्त एकच रुग्ण आढळला असून २६ जणांना मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये साथीच्या अजारांच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.नवी मुुंबईमध्येही प्रत्येक वर्षी पावसाळा, हिवाळ्यामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत असते. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी व्हायची. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नागरिकांमधील आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोसायटींमध्ये वारंवार औषधे फवारली जात आहेत. सॅनिटायझर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व आहारामध्ये केलेले बदल यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २०१९ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.  मलेरियाचे ५२ रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात  २०१९ मध्ये डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.  २०२०  मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मलेरियाचे ५२ रुग्ण होते ते २६वर आले  आहेत. मलेरिया व डेंग्यूसदृश तापाच्या  रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.  नागरिक आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. यामुळे आजारांचे प्रमाण कमी  झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली  आहे. डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; गतवर्षी ३९,६७८ पाण्याच्या टाक्यांची तपासणी महानगरपालिकेच्यावतीने डेंग्यू व मलेरियाविषयी शहरभर सर्वेक्षण करण्यात येते. डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करण्यात येतात. संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरातील इतर घरांचेही सर्वेक्षण करण्यात येते. गतवर्षी ३९६७८ पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. २६ हजारपेक्षा जास्त ड्रम, १७ हजारपेक्षा जास्त टायर तपासण्यात आले. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती लक्षात आली त्या ठिकाणी औषध फवारणी केली. बांधकाम व्यवसायिक व इतर व्यवसायिकांच्या निष्काळजीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येते. डेंग्यू व मलेरिया सदृश तापाच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात येते. डेंग्यूची लक्षणे अचानक तीव्र ताप येणे तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणे उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणे ताप कमी-जास्त हाेणे, अंगावर पुरळ येणे

टॅग्स :dengueडेंग्यूNavi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य