शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशावासींना नवी मुंबईतून मदत, सर्वाधिक नुकसान असलेले गाव घेणार दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 02:11 IST

फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. वाशीतील ओडिशा भवनमध्ये झालेल्या या बैठकीत सर्वाधिक नुकसान झालेले गाव दत्तक घेऊन तिथल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.फानी वादळामुळे ओडिशाच्या अनेक गावांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीला तिथले जनजीवन विस्कळीत झाले असून अन्नपाण्याचीही गैरसोय झालेली आहे, तर संपूर्ण भागाचा वीजपुरवठा, फोन लाइन खंडित असल्यानेही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात सुधार होण्यासाठी अद्याप तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशामध्ये प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची माहिती कळू शकणार आहे. तत्पूर्वी फानी पीडितांपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी व औषधे पुरवण्यासाठी नवी मुंबईत स्थायिक असलेल्या ओडिशावासीयांनी पुढाकार घेतला आहे. वाशीतील ओडिशा भवनमध्ये रविवारी प्रमुख व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच इच्छुक व्यक्तींनी देखील मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फानीमुळे ओडिशामधील अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.मात्र ही गावे पूर्णपणे संपर्काबाहेर असल्याने तिथली सत्यपरिस्थिती समोर येऊ शकली नसल्याची चिंता रश्मीकांत महापात्रा यांनी व्यक्त केली आहे. ही माहिती समोर आल्यास ज्या गावाचे सर्वाधिक नुकसान झाले असेल, ते गाव दत्तक घेऊन तिथले विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई