शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 23:21 IST

महापालिका आयुक्तांचे निर्देश : विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती स्थापन

नवी मुंबई : कोरोनाबाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन, जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून पालिकेस मिळत असल्याने, याची गंभीर दखल घेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती स्थापन केली आहे. खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

या पथकांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त राजेश कानडे यांच्या समवेत शनिवारी विशेष आढावा बैठक घेत, बांगर यांनी पथकांना दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व देयक तपासणीच्या त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन त्यामध्ये सुधारणा सूचित केल्या. कोरोनाबाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या २१ मे, २०२० अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी, याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रुग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना १० आॅगस्ट रोजी आदेश दिलेले आलेले आहेत. तथापि काही रुग्णालयांकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने, याची दखल आयुक्तांनी घेतली आहे.

याविषयी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिका क्षेत्रातील कोरोनावर उपचार करणाºया सर्व रुग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता ६ विशेष लेखापरीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांमधील कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी केली जात आहे. कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयांमार्फत शासनाने निश्चित केलेल्या दरांमध्येच योग्य उपचार केले जावेत व त्यामध्ये रुग्णाची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक व्हायला नको, हा उद्देश स्पष्ट करीत सर्व रुग्णालयांकडून तशा प्रकारचे बंधपत्र लिहून घ्यावे, असे आयुक्तांनी सूचित केले. या लेखापरीक्षण समितीचा उद्देश देयकांमध्ये आकारण्यात आलेल्या विविध बाबींची दर पडताळणी हा असून, त्यानुसार काम करून दर आठवड्याला पथकनिहाय तपशील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पथकांना आत्तापर्यंत देयके तपासणी करताना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती घेत, आयुक्तांनी त्यामधील सुधारणांविषयी मार्गदर्शन केले व देयके तपासणी करताना वस्तुनिष्ठ काम होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. खासगी रुग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच होणे आवश्यक आहे.तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबरखासगी रुग्णालयांमधील कोरोनाविषयक उपचारांच्या देयकांबाबत नागरिकांना तक्रार दाखल करणे सोयीचे व्हावे, याकरिता ‘कोविड १९’ बिल तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी ०२२ २७५६७३८९ हा हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक, तसेच ७२०८४९००१० हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.खासगी रुग्णालयांतील देयकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क आहे, तरी नागरिकांनी खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारांच्या देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास, ती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर करावी.- अभिजीत बांगर,आयुक्त, न.मुं.म.पा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई