शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

द्रोणागिरी नोडच्या विकासाला मिळणार आता चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 04:27 IST

सिडकोचा पायाभूत सुविधांवर भर; अडीच हजार घरांच्या दोन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर

नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या नोडच्या विकासावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सिडकोने जाहीर केलेल्या मेगा गृहप्रकल्पात द्रोणागिरी नोडमध्ये जवळपास अडीच हजार घरे आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काळात द्रोणागिरी नोडला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.साडेबारा टक्के योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने वाटप केलेले भूखंड, त्यामुळे विकासाला बसलेली खीळ, पायाभूत सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला ब्रेक बसला आहे. रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांअभावी विकासकामे ठप्प पडली आहे. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. विकासकांनी महागड्या दराने घेतलेले भूखंड जैसे थे पडून आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासकांवर दिवाळखोरीचे संकट ओढावले आहे. परंतु व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम द्रोणागिरी नोडचा दौरा करून विकासकामाची पाहणी केली होती. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे विकासक आणि गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.द्रोणागिरी सेक्टर ११ आणि सेक्टर १२ येथे अनुक्रमे मल्हार गृहसंकुल आणि भूपाळी गृहसंकुल हे दोन गृहप्रकल्प उभारले जात आहेत. पात्रताधारकांना २0२0 मध्ये घरांचे वाटप करण्याची सिडकोची योजना आहे. त्यामुळे या विभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात असलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाबाबत सिडकोची भूमिका सुरुवातीपासूनच उदासीन राहिली आहे. मागील दहा वर्षांत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो व नेरूळ-उरण रेल्वे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे द्रोणागिरीच्या विकासाचा मुद्दा मागे पडला. विशेष म्हणजे या प्रस्तावित नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणात भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. निविदा काढून अनेक भूखंडांची विक्री करण्यात आली आहेत. यात शैक्षणिक, सामाजिक, निवासी आणि वाणिज्य भूखंडांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा नसल्याने या भूखंडांचा विकास होवू शकला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत. परंतु सिडकोने आता द्रोणागिरीच्या विकासावर भर दिला आहे. पुढील वर्षभरात या विभागात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. तशा आशयाच्या सूचना लोकेश चंद्र यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई