शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:38 IST

Navi Mumbai: ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे.

नवी मुंबई : ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीआयआरटी संस्थेमार्फत सर्व इलेक्ट्रिक बसचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनएमएमटीच्या घणसोली आगारात ४ जूनला कार्यशाळेमध्ये दुरुस्तीसाठी उभी असलेली मे.जे.बी.एम. निर्मित इलेक्ट्रिक बसला आग लागली होती. त्या बसला लागलेल्या आगीमुळे तिच्या बाजूस उभ्या असलेल्या ३  बसही खाक झाल्या. एकाचवेळी चार बस खाक झाल्याची घटना ताजी असतानाच मार्ग क्र.१४४ वर कार्यरत असलेली इलेक्ट्रिक बस मरोळ बसस्थानक, अंधेरी पूर्व येथे संध्याकाळी आग लागून खाक झाली. दोन्ही दुर्घटना इंजिनात बिघाड होऊन बॅटरी पॅकमध्ये  शॉर्टसर्किट होऊन घडल्याचे निदर्शनास आले.

१९५ इलेक्ट्रिक बस ताफ्यात नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात जेबीएमच्या इलेक्ट्रिक वातानुकूलित स्वमालकीच्या ३०तसेच जीसीसी तत्त्वावरील १६५ बस कार्यरत आहेत. या बसची दुरुस्ती करण्याची जबाबदारी जेबीएम यांची आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई