शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:02 IST

बहिष्कार टाकण्यासंदर्भात तक्रार नाही

- वैभव गायकरपनवेल : पनवेल मतदारसंघात मतदारसंघात पाच लाख ५७ हजार मतदार संख्या आहे. मात्र, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने खारघर, कामोठे, कळंबोली आदी क्षेत्रातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडिया, माध्यमे यांच्यावर ही मोहीम गाजत आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासदंर्भात एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याने ही मोहीम केवळ सोशल मीडियावर सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कामोठे, कळंबोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. विशेषत: खराब रस्त्यांचे कारण दाखवत अनेक रहिवासी सोसायट्यांनी आपल्या संकुलात ‘नो सर्व्हिस नो व्होट’ अशा आशयाचे बॅनर्स लावत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू नवले यांनी प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.मतदानावर बहिष्कार टाकणाºया मतदारांचे मन वळविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोहिमेतील एकही मतदार बैठकीला फिरकला नाही. आम्हाला बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे मोहिमेतील मतदारांचे म्हणणे होते.

एकीकडे निवडणूक आयोगामार्फ त मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना काही गृहसंकुलांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाने निवडणूक निर्णय अधिकारी कामाला लागले. त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सिडको नोडमधील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. बहिष्कार टाकणाºया मतदारांचे मन वळविण्याच्या दृष्टीने शनिवारी पालिकेत उपयुक्त जमीर लेंगरेकर यांनी बैठक घेतली. या वेळी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली.

मतदानावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात एकही लेखी तक्रार आमच्या कार्यालयाला प्राप्त झाली नाही. सोशल मीडिया व माध्यमांच्या मार्फत आम्हाला बहिष्काराची माहिती मिळाली आहे. त्याची दखल घेत आम्ही सिडकोला पत्र लिहिले असून, नागरिकांच्या समस्या दूर करण्याची विनंती पनवेलचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू नवले यांनी  केली आहे.

टॅग्स :VotingमतदानSocial Mediaसोशल मीडियाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019