शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:54 IST

नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

कळंबोली : नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.पनवेल तालुक्याची लोकसंख्या कमालीची वाढली आहे. तळोजा, शेडुंग, कर्नाळा, गव्हाण या भागांतून नागरिक पनवेलला येतात. याचे कारण म्हणजे शहरात तहसील, प्रांत, निबंधकांबरोबरच इतर शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज ग्रामीण भागातून नागरिक येथे येतात. त्यापैकी अनेक जण सहाआसनी रिक्षाने प्रवास करतात. यामध्ये ये -जा करणे खिशाला परवडत असल्याने मिनीडोअरला प्राधान्य दिले जाते. याशिवाय कळंबोली, खांदा वसाहत, नवीन पनवेलमधील रहिवासीही सहाआसनी रिक्षांचा वापर करतात; परंतु नियमानुसार नगरपालिका आणि महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री आहे; परंतु पनवेलमध्ये आजही सहाआसनी रिक्षा थेट पनवेल बसस्थानकापर्यंत येतात.प्रवाशांची सोय होत असल्याने शासकीय यंत्रणाही कडक कारवाई करीत नाही; परंतु त्याचा परिणामी तीनआसनी रिक्षांच्या व्यवसायावर होत आहे. मीटर डाउन न होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककोंडी आणि इतर अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. हॉटेल, मॉल, दवाखान्यांसमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभे केल्याने वाहतूककोंडी होते. मात्र, तीनआसनी रिक्षा नाक्यांकडे बोट दाखवले जाते, तसेच आमच्यावर नियमाच्या चौकटीत व्यवसाय करण्याचे बंधन आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून घातले जाते. मग इतर वाहनांवर का कारवाई होत नाही, ते नियमांची पायमल्ली करतात तरीही त्यांना व्यवसाय करू दिला जातो हे तीनआसनी रिक्षाचालकांचे गाºहाणे आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गणवेश, कागपत्रांबरोबरच महापालिका हद्दीत प्रवेश केल्याबद्दल सहाआसनी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून सूचक इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :panvelपनवेल