शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सिंगापूर पोर्टविरोधात निर्धार मोर्चा

By admin | Updated: March 28, 2017 06:26 IST

जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि

उरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू होणाऱ्या चौथ्या अर्थात सिंगापूर पोर्टमध्ये जसखार गावाला डावलले जात असल्याच्या निषेधार्थ आणि जसखार ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी पोर्टविरोधात सोमवारी निर्धार मोर्चा काढला होता. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरच जेएनपीटी माजी ट्रस्टी दिनेश पाटील, कामगार नेते पी. जे. पाटील आणि दामोदर घरत यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घरटी एकास नोकरी आणि जसखार गावाला प्राधान्य न मिळाल्यास ग्रा. पं.च्या हद्दीत प्रस्तावित असलेली सिंगापूर बंदराची कामे बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.देशातील जेएनपीटी बंदराची गणना पहिल्या क्रमांकावर केली जाते. जसखार गावाशेजारीच असलेल्या जेएनपीटीअंतर्गत सर्वात मोठ्या लांबीच्या चौथे सिंगापूर बंदर उभारण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र सिंगापूर पोर्ट जसखार ग्रा. पं. च्या हद्दीत असूनही त्यांना न्याय हक्कांपासून आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहेत. त्याशिवाय इतरही विकासाची कामे सुरू आहेत. मात्र तरीही इतर गावांना प्राधान्य देताना जसखार गावाला जाणूनबुजून डावलले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला आहे. सिंगापूर पोर्टमध्ये नोकरीभरतीमध्ये घरटी एकास नोकरी मिळावी, ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, सर्व्हिस रोड बनविण्यात यावेत, सिंगापूर पोर्टमधील व्यावसायिक, ठेकेदारीतील कामात जसखार ग्रामस्थांना प्राधान्य मिळावे, नोकरभरतीसाठी शिक्षणाची अट बारावीपर्यंत शिथिल करण्यात यावी, वयाची मर्यादा वाढविण्यात येवून प्रकल्पग्रस्त दाखल्यांऐवजी अवार्ड प्रत जोडण्याची मुभा देण्यात यावी, सर्वच कामगार भरती प्रकल्पग्रस्तांतूनच केली जावी, जसखार ग्रामस्थांच्या मागण्या आणि समस्यांबाबत जेएनपीटी पोर्ट, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आदि विभागाच्या वरिष्ठांसोबत तत्काळ ग्रामस्थांबरोबर बैठक बोलावून योग्य मार्ग काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा आयोजित केला होता. या वेळी सिंगापूर पोर्ट अधिकारी कॅप्टन धवल, प्रशासकीय अधिकारी अवधूत सावंत यांनी ठोस आश्वासन देण्यास चालढकलपणा करताच संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (वार्ताहर)