शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उपचारासाठी नऊ तास रुग्णाची फरफट

By admin | Updated: October 22, 2014 04:22 IST

अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून पोलिसांनी एका जखमी तरुणाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात नेले

मुंबई : अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून पोलिसांनी एका जखमी तरुणाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार देऊन दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या जखमी तरुणाला अतिदक्षता विभागातील जागेचा पाच रुग्णालयात शोध घ्यावा लागला. यामुळे यासाठी तब्बल ९ तास फरफट झाल्याची घटना सोमवारी घडली. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर एका कारच्या धडकेने हा तरुण जखमी झाला. स्थानिक रिक्षाचालकाने त्याला तत्काळ विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करून पोलिसांना याबाबत कळविले. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फुले रुग्णालयात प्रथमोपचार केले. मात्र याच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करणे गरजेचे होते. मात्र सकाळीच बंद केलेल्या अतिदक्षता विभाग व उपचारासाठी अपुऱ्या सुविधांमुळे त्याला राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. साधारणत: साडेसातच्या सुमारास विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जीवन सरडे प्रशासनाच्या १०८ क्रमांंकाच्या रुग्ण्वाहिकेतून राजावाडी रुग्णालयच्या दिशेने रवाना झाले. राजावाडी रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी या तपासण्या केल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने जागेचे कारण देत सायन रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या जखमी तरुणाला घेऊन रुग्णवाहिका सायन रुग्णालयाच्या दिशेने निघाली. सायन रुग्णालयात पोहोचल्यावर अतिदक्षता विभागात जागा नाही. यामुळे त्या रुग्णावर कोणतेही उपचार न करता त्यांना परेलच्या केईएम रुग्णालयात घेऊन जा, असे लिहून दिले. केईएम रुग्णालयातही जागा नव्हतीच. मग यांना नक्की कोठे उपचार मिळणार, असा प्रश्न सरडे यांना पडला होता. यामुळे त्यांनी केईएम रुग्णालयातच यांना दाखल करून घ्या, असे सांगितले. मात्र जागेचे कारण पुढे करत जे.जे.मध्ये दाखल करा, असे सांगण्यात आले. या जखमीची प्रकृती गंभीर होती. मात्र एकही पर्याय नसल्याने त्याच अवस्थेत त्यांना भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. या सगळ्या प्रकारात जे.जे. रुग्णालयात पोहोचायला पहाट उजाडली होती. पहाटे साडेचारच्या सुमारास या जखमी तरुणाला जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा मिळाली. जखमी अजूनही बेशुद्धावस्थेतच आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सायन आणि केईएम रुग्णालयात नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असतात. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सायन आणि केईएमसारख्या रुग्णालयात उपचार मिळायलाच हवे होते. ९ तास उपचार का मिळाले नाहीत, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)