शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळावर आता ओळख पटविण्यासाठी नवे तंत्रज्ञान, 'फेस-टू-फ्लाय'मुळे बोर्डिंग प्रक्रिया होणार वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 08:40 IST

Navi Mumbai International Airport: अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला.

नवी मुंबई : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला असून, अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी दूरस्थ पद्धतीने पार पडला.

विमानतळाच्या टर्मिनलमध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात तीन प्रवाशांनी डिजीयात्रा ई-गेटचा वापर करत बायोमेट्रिक प्रवेशद्वाराचे रिबन कापले. उपस्थित प्रवाशांनीही या नव्या सुविधेबाबत उत्सुकता व्यक्त केली.

नव्या प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर; सुरक्षा तपासणी सुलभ

डिजीयात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख (फेशियल रिकग्निशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होते.

संपूर्ण प्रक्रिया कॉन्टॅक्टलेस व पेपरलेस असल्याने प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. तसेच डेटा गोपनीयता आणि सायबर सुरक्षेचे आवश्यक मानदंड काटेकोरपणे पाळले जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

डिजीयात्रा उपक्रमामुळे नवी मुंबई विमानतळाची आधुनिक, प्रवासी-केंद्रित ओळख अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Adopts 'Face-to-Fly' for Faster Boarding.

Web Summary : Navi Mumbai International Airport embraces DigiYatra, streamlining boarding with facial recognition. This contactless, paperless system speeds up security and entry, reducing wait times. Data privacy and cybersecurity are prioritized, enhancing passenger experience and efficiency. Five other airports launched simultaneously.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ