शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

नवीन शिक्षक भरतीला स्थगिती

By admin | Updated: January 31, 2017 03:44 IST

पाच वर्षे अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून नवीन भरती करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने

नवी मुंबई : पाच वर्षे अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून नवीन भरती करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने विद्यमान कंत्राटी शिक्षकांना दिलासा मिळाला असून पालिकेची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी नोव्हेंबर २०११ पासून ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पाच वर्षे तुटपुंज्या वेतनावर शिक्षक काम करत आहेत. अनेक वेळा दोन ते तीन महिने शिक्षकांना विनावेतन काम करावे लागले होते. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिक्षकांचे परिश्रम लक्षात घेवून त्यांना १२ हजार रूपये मानधन करण्याच्या सूचना प्रशासनाला देवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. पण विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात ठोक मानधनावरील ७२ शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात महापालिकेने आमच्याकडे अतिरिक्त शिक्षक असून या शिक्षकांची आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले होते. पण प्रत्यक्षात २१ डिसेंबरला वृत्तपत्रामध्ये ठोक मानधनावर शिक्षक भरती करण्याची जाहिरात देण्यात आली होती. विद्यमान शिक्षकांना कामावरून कमी करून दुसरीकडे पुन्हा तशाचपद्धतीने शिक्षक भरती केली जात असल्याचे शिक्षकांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे न्यायालयाने महापालिकेच्या शिक्षक भरतीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यापासून हे सर्व शिक्षक विनावेतन काम करत आहेत. त्यांना पुन्हा वेतन सुरू करावे अशी मागणी होवू लागली आहे. मुंबई व ठाणे परिसरात महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या घसरत असताना नवी मुंबईमध्ये मात्र पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पाच वर्षापूर्वी ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही शिक्षक काम करत असताना त्यांना न्याय देण्यापेक्षा वारंवार कामावरून कमी करण्याची चर्चा होत आहे. यामुळे त्यांच्या कार्यशैलीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेचा अभ्यास कच्चाआयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून विविध विभागात धडक कार्यवाही सुरू आहे. एपीएमसी, इनॉर्बिटसह अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पण अनेक ठिकाणच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कारवाई करताना घाई होत असल्याने हे अपयश पदरात पडत असल्याचे मत शहरवासी व्यक्त करू लागले आहेत.