बोईसर : वाहतुकीचे कायदे काटेकोरपणो पाळले गेल्यास रस्ते अपघातांवर बरेचसे नियंत्रण येऊन अनेक निष्पापांचे नाहक बळी जाणार नाहीत त्याकरीता वाहतुकीचे कायदे पाळण्याची भावनाही अंतरमनातून होणो गरजेचे असल्याचे प्रतिपादन सीआयएसएफ चे डेप्युटी कमांडट कुडे यांनी तारापूर येथे केले.
बोईसर पोलीस उपविभागातर्फे दि. 2क् ते 26 नोव्हेंबर वाहतूक सजगता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. त्या मोहिमेचा समारोपाचा कार्यक्रम आज टीमा हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी अध्यक्षपदी कुडे तर प्रमुख पाहुणो म्हणून शैक्षणिक क्षेत्रत महत्वाचे योगदान दिलेले रजनीकांत भाई o्रॉफ तर व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी विजयकांत सागर, एपीआय महेश पाटील, दुर्गेश शेलार व अरूण फेगडे उपस्थित होते तर कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रतील मान्यवर व नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कुडे यांनी वाहतुक सजगता मोहिमेचा हा समारोप नसून सुरूवात असल्याचे सांगितले.
या मोहिमेचे रुपांतर आपण चळवळीत करून पालघर जिल्हा हा वाहतुकीचे नियम पाळणारा असा आदर्श जिल्हा घडवू या असे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले तर रजनीकांत o्रॉफ यांनी वाहतूक सजगतेची प्रज्वलीत करण्यात आलेली ज्योत सतत तेवत ठेवूया असे सांगितले. तर विजयकांत सागर यांनी वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य सांगुन मोहिमेसंदर्भात आढावा घेऊन मोहिम यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
मोहिमेची फलनिष्पत्ती काय?
पोलीसांनी गांधीगीरीच्या माध्यमातुन 18क्क् व्यक्तींना गुलाबपुष्पाचे वाटप केले. मोटार वाहन कायद्याअंतर्गत 31क् जणांवर केसेस केल्या. शाळा कॉलेज भेटी व स्लाईड शोच्या माध्यमातून 22 शाळांमधून 3क्क्क् विद्याथ्र्याना मार्गदर्शन करण्यात आले. 14 शाळेत शालेय स्पर्धा घेतल्या त्यामध्ये 9क्क् विद्याथ्र्याचा सहभाग, पथनाटय़ातून वाहतूक सजगता अनुभवण्यासाठी 8क्क् जणांचा जनसमुदाय, 21क्क् सायकली व वाहनांना रिफ्लेक्टर लावले. 1क्क्क् माहिती पत्रकाचे वाटप 4क्क्क् बँचेसचे वाटप, हजारोंना शपथ, रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरे.