शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

By नारायण जाधव | Updated: November 7, 2023 18:41 IST

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाची धुरा अखेर तुर्भे येथील माजी नगरसेवक तथा माथाडी नेते (सी आर पाटील) चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पाटील घराण्यात दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद आले आहे. यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ बंधू स्व. डी. आर. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष होते.

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर पक्षाचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादीचे यापूर्वीचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केल्यापासून पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर चंद्रकांत पाटील हेच प्रबळ दावेदार होते. कारण, स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच आगरी समाजाचे असून माथाडी युनियनमध्ये पूर्वीपासून सक्रिय आहेत. यामुळे पक्षाला पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांसह माथाडी कामगारांत प्रिय असलेली व्यक्ती अध्यक्षपदी मिळाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद, प्रथितयश व्यावसायिक म्हूणन ते शहरात परिचित आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे धर्मनिरपेक्ष विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शहरांत राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवून नवी मुंबईत महाविकास आघाडीला बळकटी देण्यावर आपला भर राहील, पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारNavi Mumbaiनवी मुंबई