शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

By नामदेव मोरे | Updated: January 10, 2024 17:37 IST

Navi Mumbai: मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. पहाटेपासून शुद्ध हवेत श्वास घेता आल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

 तळोजासह ठाणे बेलापूर एमआयडीसी, सायन-पनवेल, जेएनपीटी महामार्गासह अनेक प्रमुख रस्ते, विमानतळासह मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे यामुळे नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. हवेतील धुलिकण वाढले असून, हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत चालला आहे. मंगळवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५२ एवढा होता. रात्री पाऊस पडल्यामुळे सर्व रस्ते व मोकळ्या भूखंडावरील धुलिकण खाली बसले. यामुळे बुधवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ९५ वर आला. प्रत्येक विभागातील प्रदूषण कमी झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत असले तरी नवी मुंबईकरांच्या मात्र हा पाऊस पथ्यावर पडला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनीही शुद्ध हवेमुळे समाधान व्यक्त केले. महानगरपालिकांसह सर्वच शासकीय संत्रणांनी थोडा वेळ पाऊस पडल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक कसा सुधारला व इतर वेळीही प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करावा, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांनी केली आहे. नवी मुंबईमधील विभागनिहाय हवेचा निर्देशांकविभाग - ९ जानेवारी - १० जानेवारीकोपरी - १२६ - ९२महापे १३६ - ९९नेरूळ १२३ - ६९सानपाडा १२२ - ८८कळंबोली - १९४ - ८६तळोजा १४४ - ८५

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस