लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शहरातील सर्व हॉस्पिटलमधील आयसीयू व व्हेंटिलेटर्स फुल्ल झाले आहेत. उपचारासाठीची वेटिंग लिस्ट वाढली आहे. वेळेत बेड मिळत नसल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेड उपलब्ध व्हावा यासाठी धडपड करत आहेत. शहरातील स्थिती हाताबाहेर गेली असून प्रत्येक नागरिकाने स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनही करत आहे. कल्याण परिसरातील एका वृद्ध महिलेला कोरोना झाला. रविवारी रात्री सदर महिलेची ऑक्सिजनची पातळी घसरू लागली. नातेवाईकांनी त्यांना रुग्णवाहिकेमधून विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक रुग्णालयात जागा नसल्याचे उत्तर मिळू लागले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महिलेला नवी मुंबईतील एक रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तेथेही जागा उपलब्ध नाही. परिचितांनी नवी मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये फोन केले, परंतु जागा उपलब्ध झाली नाही. अखेर पहाटे पनवेल परिसरातील एका रुग्णालयात जागा उपलब्ध झाली व रुग्णांसह नातेवाईकांना अल्पसा दिलासा मिळाला. रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची अनेक उदाहरणे शहरात समोर येऊ लागली आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये जागाच उपलब्ध नाही.रुग्णालयात जागा मिळत नसल्यामुळे मृत्यू दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,परंतु अद्याप अनेक नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे पालन न करणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. वेळेत चाचणी केली जात नाही. यामुळे प्रकृती गंभीर होत असून रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासत आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन उपाययोजना करत आहे, परंतु नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
दिवस-रात्र फोन सुरूरुग्णालयात जागा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना चोवीस तास फोन केले जात आहेत. काहीही करा पण रुग्णालयात जागा मिळवून द्या. आमच्या रुग्णाचा जीव वाचवा अशी साद घातली जात असून रुग्णालयात जागा मिळवून देताना सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रुग्णालय निहाय शिल्लक बेड्सचा तपशीलतेरणा हॉस्पिटल ०फोर्टीस हॉस्पिटल ०रिलायन्स ०एमजीएम सीबीडी ०एमपीसीटी ०अपोलो ०पीकेसी १७इंद्रावती ०सनशाईन १सिडको एग्झीबिशन ७६डी. वाय. पाटील ०न्यू मिलेनियम ८न्यू मानक २फ्रीजन २व्हीनस ८राजपालन ०सिद्धीका ०एमजीएम वाशी ०एमजीएम सानपाडा १९ओजस ०क्रिकेकेअर ०ग्लोबल हेल्थ केअर ०डिव्हाईन ११श्री हॉस्पिटल ०साई सेवा ५सत्यम २सुयश १२ॲपल ०राधा स्वामी सत्संग भवन १६३