शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांचा बुधवारचा दिवसही पाण्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:49 IST

ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झाले. विशेष म्हणजे गुरुवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या संबंधित विभागाने जाहीर केले आहे.महापालिका स्वमालकीच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करते. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. असे असले तरी केवळ तांत्रिक अडचणीमुळे शहरवासीयांना मागील तीन दिवसांपासून पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा करणाºया रोहित्रात सोमवारी बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीनंतरही पुन्हा अडचणी निर्माण झाल्याने मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे हे काम सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणी वाढल्याने बुधवारीसुद्धा शहरवासीयांचा नियमित पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, सलग तीन दिवस अनियमित पाणीपुरवठा झाल्याने रहिवाशांचे हाल झाले. विशेषत: चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची कसरत झाली. पिण्यासाठी अनेकांना बिस्लरी बाटल्यांचा वापर करावा लागला, तर त्या त्या विभागातील जलकुंभाच्या बाहेर पाण्यासाठी रहिवाशांची रीघ लागल्याचे दिसून आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई