शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Navi Mumbai: पाम बीचवरील अनधिकृत रोपवाटिका तोडली तरी, राडारोडा तसाच पडून

By नारायण जाधव | Updated: May 11, 2024 15:24 IST

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरील भूखंडांना कोट्यवधींचे माेल असून, येथील डीपीएस शाळेसमोरील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाहेर एका माेक्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली रोपवाटिका महापालिकेने पुन्हा एकदा तोडली आहे. मात्र, ती तोडल्यानंतरही लगतच्या भूखंडावर राडारोडा तसाच पडून आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरील भूखंडांना कोट्यवधींचे माेल असून, येथील डीपीएस शाळेसमोरील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाहेर एका माेक्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली रोपवाटिका महापालिकेने पुन्हा एकदा तोडली आहे. मात्र, ती तोडल्यानंतरही लगतच्या भूखंडावर राडारोडा तसाच पडून आहे. यामुळे हा परिसर स्वच्छ करून या ठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.

या ठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित केल्यास पालक आणि डीपीएस शाळेतील अभ्यागतांना विश्रांतीसाठी हक्काचे ठिकाण होऊ शकते, तसेच स्पर्धा परीक्षा किंवा बोर्ड परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तेथे विश्रांती घेता येईल. कारण या भागात आश्रय घेण्यासाठी जागा नाही, अशी सूचना पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे.

या रोपवाटिकेत रात्री असामाजिक घटकांचा वावर होत असल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी फेब्रुवारी महिन्यात ही रोपवाटिका तोडून परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. मात्र, सुरक्षारक्षक बदलून ती राेपवाटिका पुन्हा उभारल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत अगरवाल यांनी पुन्हा एकदा तक्रार केल्यानंतर महापालिकेने ती तोडली आहे. महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हमहापालिकेने बेकायदेशीर रोपवाटिका तोडली असली तरी तिच्या लगतच टाकून दिलेले आणि तुटलेले लाकडी फर्निचर, तुटलेल्या काच आणि इतर धोकादायक कचरा अस्ताव्यस्तपणे तसाच पडून आहे. यामुळे डीपीएस सिग्नल परिसरात येणाऱ्या नागरिकांना हे ओंगळवाणे दृश्य नजरेस पडत आहे. शिवाय या परिसरातून अत्यंत दुर्गंधी पसरत असून त्यामुळे या परिसरात उभे राहणे किंवा चालणे कठीण झाले आहे. पाम बीच रोडच्या शेजारी असलेल्या प्रतिष्ठित डीपीएस स्कूल आणि एनआरआय कॉम्प्लेक्सच्या शेजारी ही स्थिती असेल तर महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात इतके उच्च रँकिंग कसे मिळवते, असा प्रश्न करण्यात येत आहे. याशिवाय डीपीएस शाळेसमोरील याच रस्त्यावर काही जुनी गंजलेली वाहनेही पडून आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका