शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन; ३ महिन्यात मोडला संसार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 17, 2023 17:51 IST

उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उलवे परिसरातील मोरावे गावात रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या सलोनी वैभव म्हात्रे (१९) या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मी महिन्यात तिचा वैभव म्हात्रे (२०) सोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरहून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू व दीर देखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करत होते. त्यामुळे सलोनीचे आई वडील तिच्या सुखासाठी तिला पैसे देखील पुरवत होते. शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवण देखील घेऊन गेली होती. तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आले नव्हते.

 काही वेळाने सलोनीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. प्रेमविवाह करून देखील पतीकडून झालेली निराशा व सासरी होणारा छळ याला कंटाळून तिने आत्महत्या  आरोप तिचे वडील देविदास मुंढेकर यांनी केला आहे. त्यानुसार रविवारी रात्री एनआरआय पोलिस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट