शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई: एपीएमसीतून तीन वर्षीय मुलीचे अपहरण 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 13, 2024 19:56 IST

एपीएमसी परिसरातून तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडली होती.

नवी मुंबई: एपीएमसी परिसरातून तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडली होती. मात्र घटनेनंतर पोलिस तात्काळ संबंधितांच्या मागावर असतानाच त्यांनी सदर मुलीला परत सोडून पळ काढला. यादरम्यान तिच्यासोबत अनुचित कृत्य घडले नसून त्यांनी कोणत्या कारणांनी तिचे अपहरण केले याचा उलगडा करण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

एपीएमसी मधील पुनीत कॉर्नर झोपडपट्टी परिसरात हि घटना घडली आहे. परिसरात राहणारी ३ वर्षीय मुलगी रस्त्यालगत खेळत असताना एक दुचाकीस्वार त्याठिकाणी आला. त्याने मुलीला खायला देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून नेले होते. हा प्रकार पालकांच्या निदर्शनात येताच त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी तातडीने मुलीच्या शोधासाठी पथके तयार केली होती. त्यामध्ये दुचाकीच्या माहितीवरून संशयित तरुणांच्या घरापर्यंत पोलिस पोहचले होते. त्याचवेळी पोलिस आपल्या मागावर असल्याचे तरुणाला समजताच त्याने रात्री १० च्या सुमारास सदर मुलीला परत त्याच परिसरात सोडून पळ काढला. यावेळी मुलीसोबत गैर कृत्य घडले आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यासोबत काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नेमके कोणत्या कारणांनी तिचे अपहरण केले होते असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यासाठी संबंधित तरुणाच्या मागावर पोलिस आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात संबंधितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी