शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:30 IST

कसे असणार मतांचे गणित : नवी मुंबई, मीरा-भाईंदर राष्ट्रवादीला निर्णायक

- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे मतदारसंघात इतर उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे.मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या हातातील तीन विधानसभा मतदारसंघ निसटले, तर शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आता पाच मतदारसंघ आले आहेत; परंतु आता मोदीलाट ओसरली असल्याने राष्टÑवादीने ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांवर आपली मदार ठेवली आहे. तर, मीरा-भार्इंदरमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी हा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी खरी लढत ही राष्टÑवादी आणि शिवसेनेतच होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा, ऐरोली, बेलापूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून राष्टÑवादीची पीछेहाट झाली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. राष्टÑवादीचा तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला. केवळ, ऐरोली मतदारसंघच त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. शिवाय, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा नवी मुंबई वगळता, ठाणे आणि मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, भाजपचे नगरसेवक वाढलेले आहेत. परंतु, आता नवी मुंबई महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या मतांचा टक्का घटेल, असे बोलले जात आहे. तर, याच दोन मतदारसंघांतील मते राष्टÑवादीसाठी निर्णायक आणि निकालाला कलाटणी देणारी ठरू शकणार आहेत. शिवाय, मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेसने राष्टÑवादीला मदत केली, तर काहीअंशी मते वाढण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेसाठी कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजिवडा हे तीन मतदारसंघ निर्णायक ठरणार असून तेच टर्निंग पॉइंट ठरूशकणार आहेत.दोन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभागऐरोली आणि बेलापूरमध्ये सध्या नाईक फॅमिलीचे वर्चस्व आहे; परंतु मागील महापालिका निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ झालेली आहे, असे असले तरी हा पट्टा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी निर्णायक ठरूशकणार आहे.ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या या शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत. या दोनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचा ९९ टक्के भरणा आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्टÑवादीने लीड घेतले, तरी तो हा पट्टा मोडू शकतो.मागील निवडणुकीत शिवसेनेला ऐरोली २५ हजार, बेलापूर २० हजार, ठाणे ६० हजार, कोपरी-पाचपाखाडी ६८ हजार, ओवळा-माजिवडा ५८ हजार आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते तोडण्याचे आव्हान राष्टÑवादीसमोर असणार आहे.2009ऐरोली, बेलापूर, ओवळा -माजिवडा येथे नाईक यांना जास्तीची मते मिळाल्यामुळे निकालाची दिशा बदलली होती.2014या ठिकाणाहून विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी येथून एकगठ्ठा मते मिळाली होती.

टॅग्स :thane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक