Navi Mumbai Municipal Election 2026 | लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाशी विभागात नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी करत असताना एक मर्सिडीज कारमध्ये १६ लाख १६ हजार रूपयांची रोखड सापडली आहे. निवडणूक विभागाने रोखड जप्त केली असून पैसे कोठून व कशासाठी आणले याची तपासणी केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक विभागाने भरारी पथके व तपासणी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून संपूर्ण शहरभर लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता तुर्भे विभागातील प्रभाग १४, १५, १९ व २० मधील तपासणी पथकाने वाशीतील अरेंजा कॉर्नर येथे एक मर्जीडीज कारची तपासणी केली. कारमध्ये साध्या पिशवीमध्ये राेख ठेवल्याचे आढळून आले. व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजले असताना १६ लाख १६ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे पैसे संबंधीतांनी कोठून आणले याविशयी तपास केला जात आहे. आयकर विभाग व जीएसटी विभागालाही याविषयी माहिती देण्यात आली आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे, तुषार दौंडकर, अधीक्षक वसुली अधिकारी संजय गायकवाड, सचिन सुर्यवंशी, अजय शेलार व पथकातील इतर सदस्यांची ही कारवाई केली आहे.
Web Summary : During vehicle checks in Vashi, election officials seized ₹16.16 lakh from a car. The cash's origin and intended use are under investigation. Income Tax and GST departments have been notified. Authorities are strictly enforcing the code of conduct for the upcoming Navi Mumbai Municipal elections.
Web Summary : नवी मुंबई के वाशी में वाहन जांच के दौरान चुनाव अधिकारियों ने एक कार से 16.16 लाख रुपये जब्त किए। नकदी के स्रोत और इच्छित उपयोग की जांच जारी है। आयकर और जीएसटी विभागों को सूचित किया गया है। आगामी नवी मुंबई नगर निगम चुनावों के लिए आचार संहिता का सख्ती से पालन किया जा रहा है।