शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नवी मुंबई महानगरपालिकेचा विक्रमी ७१६ कोटी मालमत्ताकर जमा; गतवर्षीपेक्षा ८३ कोटी अधिक वसूली 

By नामदेव मोरे | Updated: April 1, 2024 19:17 IST

नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षभरात मालमत्ताकराच्या माध्यमातून ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर प्राप्त झाला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षभरात मालमत्ताकराच्या माध्यमातून ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर प्राप्त झाला आहे. गतवर्षीपेक्षा ८३ कोटी ६६ लाख रुपये जादा कर वसूल झाला असून वर्षअखेरीस शेवटच्या तीन दिवसात ४१ कोटी २६ लाख कर संकलन झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. महानगरपालिकेने दोन दशकांपासून करवाढ केलेली नाही.नवीन मालमत्ता संकलनाच्या कक्षेत आणून उत्पन्नामध्ये वाढ करण्यात येत आहे. गतवर्षी ६३३ कोटी ३१ लाख रुपये मालमत्ता कर संकलीत झाला होता. 

२०२३ - २४ वर्षामध्ये जास्तीत जास्त कर संकलन करण्यासाठी वर्षभर नियोजन करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी करवाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. वर्षअखेरीस नवीन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही कर संकलनावर लक्ष केंद्रीत केले होते. यावर्षी ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर वसुल करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा ८३ कोटी ६६ लाख रुपये जास्त कर जमा झाला असून मार्चमहिन्यात १६३ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.          महानगरपालिकेने कर संकलनासाठी १ त ३१ मार्च दरम्यान अभय योजना लागू केली होती. २० मार्च पर्यंत थकीत कर भरणाऱ्यांना दंड रक्कमेवर ७५ टक्के सवलत दिली होती. शेवटच्या दहा दिवसात दंड रकमेत ५० टक्के सवलत दिली होती. शहरातील ८७४० थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. कर वसूलीसाठी पाठपुरावा केला होता. अभय योजनेलाही प्रतिसाद मिळाला असून ४५ कोटी ५६ लाख रुपये थकीत कर वसूल झाला आहे.

सुट्टीच्या दिवशीही सुरू होते कार्यालयआर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन दिवस सुट्टी होती. परंतु महानगरपालिकेची आठ विभाग कार्यालय व मुख्यालयातील कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. २९ मार्चला २८ कोटी ७८ लाख रुपये, ३० मार्चला ८ कोटी ३८ लाख रुपये व ३१ मार्चला ४ कोटी १० लाख रुपये कर संकलन झाले आहे. शेवटच्या तीन दिवसात ४१ कोटी २६ लाख रुपये कर संकलन झाले असून यासाठी मालमत्ता कर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका