शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मनपा मुख्यालयातील कर्मचारी लेट लतीफ, ११ वाजेपर्यंत खुर्च्या रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:03 IST

Navi Mumbai News : नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका मुख्यालयात कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी अनेक विभागांत ११ वाजल्यानंतर कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, वेळेवर कामावर न येणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  नवी मुंबई पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनुपस्थित डाॅक्टरांना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कर्तव्यावर हजर होतात का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर हजर होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. बुधवारी काही दक्ष नागरिकांनी मनपा मुख्यालयात जाऊन पाहणी केली असता, अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे निदर्शनास आले. मनपा मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची सकाळी पावणेदहा ते सायंकाळ सहा अशी कामाची वेळ आहे. एलबीटी, वाहन, उद्यान विभागातील कर्मचारी ११ वाजले, तरी कामावर हजर नव्हते. १२ वाजेपर्यंत अनेक जण कामावर येत असल्याचेही निदर्शनास आले. मनपा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसतील, तर मुख्यालयाबाहेर विभाग कार्यालय, रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, एनएमएमटी येथील अधिकारी व कर्मचारी कसे वेळेवर येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आयुक्तांनी पाहणी करावीयापूर्वी महापौर व आयुक्तांनीही प्रवेशद्वारावर उभे राहून कोण वेळेवर येते व कोण उशिरा येते, याविषयी माहिती घेतली होती. तुकाराम मुंढे आयुक्तपदावर असताना वेळेत जागेवर उपस्थित नसणाऱ्यांवर निलंबित करण्याची कार्यवाहीही केली होती. विद्यमान आयुक्तांनीही कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

मनपा मुख्यालयात व विभाग कार्यलयांमध्येही अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत. बुधवारी मुख्यालयातील अनेक विभागांत ११ वाजल्यानंतरही कर्मचारी उपस्थित नव्हते. रिकाम्या खुर्च्यांच्या छायाचित्रांसह निवेदन आयुक्तांना देऊन उशीरा येणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. - सचिन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाEmployeeकर्मचारी