शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 23:54 IST

महासभेने केली ४५० कोटींची वाढ : अनेक नगरसेवकांची दांडी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महासभेने ४५० कोटींची वाढ सुचवून ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती आणि महासभेने वाढ केलेली रक्कम ७५० कोटी झाली आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला अनेक नगरसेवक अनुपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी १८ फेब्रुवारी रोजी २०२०-२१ या वर्षासाठीचे ३८५० कोटी रु पयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभेत सादर केले होते. त्यानंतर या अर्थसंकल्पावर स्थायी समिती सभेत चर्चा करून ३०० कोटी रु पयांची वाढ करण्यात आली होती. बुधवार, ११ मार्च रोजी संपन्न झालेल्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी सदर अर्थसंकल्प महासभेत मांडला. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्प मांडलेल्याच दिवशी चर्चा करून मंजुरी देण्यात आली. महापालिकेत निवडून आलेले १११ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर फक्त १८ सदस्यांनी चर्चा करून विविध नागरी विकासकामांच्या सूचना आणि उत्पन्नात वाढ सुचविली. सदस्यांनी नाला व्हिजन, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, पार्किंग, उद्यानांचा विकास, पर्यटनस्थळांचा विकास, मार्केट, रस्ते आदी विषयांवर चर्चा केली. तर अनेक नगरसेवकांनी मागील अर्थसंकल्पात मांडलेली कामे अद्याप झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्या वतीने अर्थसंकल्पात वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी मागील अर्थसंकल्पातील तरतुदी प्रशासन बदलल्याने राहून गेल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले असून, भरती प्रकिया आणि साहित्य खरेदीला प्रशासनाने वेळकाढूपणा केल्याचा आरोप महापौर सुतार यांनी केला.सेना नगरसेवकांवर गटनेत्यांची नाराजीअर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळताना भाजपचे ३५ आणि शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर आणि नगरसेविका नंदा काटे दोनच नगरसेवक उपस्थित होते. सभागृहात महासभेला न बसणाऱ्या शिवसेना नगरसेवकांबद्दल शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी नाराजी व्यक्त करीत अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर नगरसेवकांना गांभीर्य नसल्याचे ते म्हणाले. याबाबत वरिष्ठांना कल्पना देणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविरामसर्वसामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक आणि महापालिकेतील विविध पदे आमदार गणेश नाईक यांच्यामुळे मिळाली असून नाईक यांनी आमचे कुटुंबीय आणि दिघावासीयांवर वडिलांप्रमाणे प्रेम केले आहे. त्यामुळे नाईक यांची साथ आम्ही तीनही नगरसेवक आणि आमच्या प्रभागातील नागरिक कधीही सोडणार नसल्याचे स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी स्पष्ट करीत गवते यांच्या पक्षांतर करण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका