शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मेट्रो आजपासून धावणार; पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर दरम्यान सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:18 IST

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे.

नवी मुंबई : मंत्र्यांच्या तारखांअभावी मागील वर्षभरापासून रखडलेला नवी मुंबईमेट्रोचा प्रवास शुक्रवारपासून प्रत्यक्षात साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार उद्घाटनाची औपचारिकता न करता  बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रोचा पहिला टप्पा आजपासून प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतला. 

दीर्घकाळ रखडलेला बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज आहे. या मार्गावर  एकूण ११ स्थानकांसह तळोजा पांचनंद येथे आगार (डेपो) आहेत. मेट्रोचे संचालन करण्यासाठी सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्याची सर्व तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. परंतु, केवळ उद्घाटनाच्या सोपस्कारासाठी हा प्रवास रखडला होता. नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटू लागल्याने मेट्राे आता धावू लागेल.

दुपारी तीन वाजता धावणार पहिली मेट्रो

बेलापूर ते पेंधर दरम्यान दोन्ही स्थानकांतून दुपारी तीन  वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर शेवटची मेट्रो रात्री दहा वाजता असेल. १८ नोव्हेंबरपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो धावणार असून, दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी रात्री दहा वाजता होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. 

पंतप्रधानांचा दाैरा रद्द झाल्यामुळे... गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याची योजना सिडकोने आखली होती. मात्र, पंतप्रधानांचा नियोजित नवी मुंबई दौरा रद्द झाल्याने हा मुहूर्त टळला. त्याच वेळी मेट्रो सेवा सुरू करावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांनी सिडकोच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. 

१० ते ४० रुपये असेल तिकीट दर ० - २ किमी : १० रुपये  २ ते ४ किमी : १५ रुपये   ४ ते ६ किमी : २० रुपये  ६ ते ८ किमी : २५ रुपये  ८ ते १० किमी : ३० रुपये  १० किमी : पुढील अंतरासाठी ४० रुपये प्रवास भाडे.

बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून, नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.  सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. - अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको