शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: आंबा निर्यातीसाठी मार्केट २४ तास खुले, बाजार समितीचेही प्रोत्साहन, व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधांचीही पूर्तता

By नारायण जाधव | Updated: March 13, 2024 18:45 IST

Mango Export News: आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई - आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आंबाविक्रीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोकणच्या हापूससह गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व केरळवरून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी ३०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल आंबा हंगामामध्ये होत असते. येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते.

बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये ४१ निर्यातदारांची कार्यालये आहेत. बाजार समितीने स्वतंत्र निर्यातभवन इमारतही बांधली आहे.आंबा हंगामामध्ये निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यामधील निर्यातक्षम आंब्याची निवड, पॅकिंग व इतर प्रक्रिया पुर्ण करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत.

आंबा घेवून येणारी वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये येण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. गेट क्रमांक ३ मधून फक्त आंबा घेवून येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मार्केटमध्ये स्वच्छतेपासून इतर सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. मार्केटमधून सद्यस्थितीमध्ये ८ ते १० हजार पेट्यांची नियमित निर्यात सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला आहे. व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. निर्यातीसाठी २४ तास मार्केटमध्ये खुले ठेवले आहे.- संगीता अढांगळे, उपसचिव, फळमार्केट

आंबा आवक वाढलीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी ३४ हजार ५५७ पेट्यांची आवक झाली असून यामध्ये २६,२२० पेट्या कोकण व ८,३३७ पेट्यांची आवक इतर राज्यांमधून झाली आहे. पुढील आठवड्यात आवक अजून वाढण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :MangoआंबाAlphonso Mangoहापूस आंबाNavi Mumbaiनवी मुंबई