शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:43 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला असून, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे व सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहतूकदार व प्रवासी त्रस्त झाले आहेत. एपीएमसी व इतर ठिकाणी कष्टाची कामे करणारेही त्रस्त झाले आहेत.नवी मुंबईमध्ये जून अखेरपासून नियमित पाऊस सुरू झाला असून सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप पाऊस थांबलेला नाही. मंगळवारी पडलेल्या पावसामुळेही ठाणे-बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे या रोडवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शहरात इतर रोडवरही खड्ड्यांमुुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले होते. सानपाडा भुयारमार्गाजवळची परिस्थितीही गंभीर झाली होती. येथे रोडवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते बुजविणेही शक्य होत नाही. या वर्षी शहरात ३० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले होते. २००५ नंतर प्रथमच एमआयडीसीमधील वसाहतींमध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी पूर्ण वर्षभरात २६३६ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी तब्बल ४१३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले असून, शॉर्टसर्किट व इतर घटनाही वाढल्या आहेत.पाऊस थांबत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजार समितीमध्ये मालाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांनाही काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाले, मार्केटिंग व इतर काम करणारे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. प्रवास करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन महिन्यांपासून रेल्वेसेवाही अनेक वेळा विस्कळीत झाली आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. बस व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना खड्डे व वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत आहे. गॅरेजसमोर वाहने उभी करण्यासही जागा उपलब्ध नाही.>अपघाताचे प्रमाणही वाढलेपाऊस सुरू झाल्यापासून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पनवेलमध्ये नदीमध्ये वाहून गेल्यामुळे तीन ते चार जणांना जीव गमवावा लागला आहे. पांडवकडा धबधब्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर व इतर ठिकाणी झालेल्या अपघातामध्येही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड व इतर ठिकाणी रोज अपघात होत आहेत. पाऊस थांबत नसल्यामुळे खड्डेही बुजविण्याच्या कामातही अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

 

>वर्षनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी २००७ २४४८.००२००८ २३१७.२८२००९ १६७०.१७१०१० २३६३.४३२०११ २६१०.६३२०१२ २२५२.५९२०१३ ३३३७.२८२०१४ २५८३.५२२०१५ १६०१.१४२०१६ २७०६.४२२०१७ ३०८८.२४२०१८ २६३६.७८२०१९ ४१३७.०३(११ सप्टेंबर २०१९ पर्यंत)>मोरबे धरण परिसर पाऊसवर्ष पाऊस धरण पातळी२००४ ३१७४.३४ ७२.००२००५ ४४६६.११ ७९.६०२००६ ४२९७.८० ८४.१८२००७ ३३४३.८० ८७.२५२००८ ३५७४.०० ८८.००२००९ २४२६.२० ८४.७५२०१० ३५५८.०० ८७.३५२०११ ३८३६.०० ८८.००२०१२ २९१६.४० ८४.६३२०१३ ३९८४.३० ८८.००२०१४ ३१३८.२० ८७.४५२०१५ २२००.२० ७९.५१२०१६ ३३२८.२० ८५.६०२०१७ ४१३९.०० ८८.००२०१८ ३२३८.२० ८८.००२०१९ ४८२१.०० ८७.७५(१७ सप्टेंबर २०१९ पर्यंत)पाऊस (मि.मी.) पातळी (मीटर)>सततच्या पावसामुळे रिक्षाचालकही त्रस्त झाले आहेत. पावसात भिजल्यामुळे अनेक चालक आजारी पडत आहेत. वाहने नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे.- पद्माकर मेहेर, अध्यक्ष,नेरुळ विभाग रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संस्था

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई