शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 18:16 IST

महापालिका निवडणूक लढविण्याचे राज ठाकरे यांचे संकेत

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. सानपाडा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र महोत्सव प्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी पालिका निवडणूक कालावधीत नवी मुंबईत आपली तोफ डागणार असल्याचे ठाकरे यांनी संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवार उतरवणार असल्यावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणूक काळात शहरात आपली सभा लागल्यास राजकीय भाष्य करू, असे वक्तव्य त्यांनी सानपाडा येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष स्थापनेपासून नवी मुंबईतील मनसैनिक पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. परंतु पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याची अधिकृत घोषणा होत नसल्याने त्यांचा हिरमोड होत होता. पर्यायी नाराज मनसैनिकांकडून बंडखोरी करून निवडणूक लढवली जात होती. तर मागील दहा वर्षांत अनेकांनी पक्ष निवडणूक लढवत नसल्याच्या कारणावरून पक्षांतर केले आहे.

काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या गळतीला नवी मुंबईत सुरुवात झाली होती. परंतु शहर अध्यक्ष गजानन काळे व पक्षाच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या हालचालीमुळे ही गळती थांबली होती. अशातच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा होणार असल्याचे संकेत दिल्याने मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी जनविकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत सानपाडा येथे पश्चिम महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास राज ठाकरे यांनी शनिवारी उपस्थिती दर्शवली होती. या वेळी आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते. सदर महोत्सवादरम्यान पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण, कुस्त्यांचे जंगी सामने यासह शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका