शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Navi Mumbai: मराठी नजरेतून डॉ. मृण्मयी भजक यांनी घडविली अमेरिकेची खट्टी मीठी सफर

By योगेश पिंगळे | Updated: January 20, 2024 17:32 IST

Navi Mumbai News: मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई - मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीच्या पंधरवड्यातील तिसरे कार्यक्रमपुष्प गुंफतांना लेखिका, निवेदिका डॉ.मृण्मयी भजक यांनी ‘अमेरिका खट्टी मीठी’ या एकपात्री सादरीकरणातून मराठी चष्म्यातून अमेरिकेचे आंबट-गोड दर्शन घडविले.

नाट्य अभिवाचन स्वरुपात दृष्क–श्राव्य माध्यमातून साकारलेल्या या कार्यक्रमातून उपस्थितांना सभागृहात बसून अमेरिकेची सफर घडली. अमेरिकेतील सेंट जोसेफ गावात निवेदिकेचे वास्तव्य्‍, तेथील निसर्गाच्या बदलांचे होणारे परिणाम, तिथल्या स्त्रियांच्या भावनांचे हिंदोळे, स्त्रियांना खूप मूले असण्याचा वाटणारा अभिमान, लग्नाशिवाय होणा-या संततीला स्वीकारणारा समाज, जोडीदार सोडून गेल्यानंतर आलेले एकलेपण अशा विविध भावावस्था त्यांनी उत्तम अभिनयातून व अभिवाचनातून प्रभावीपणे साकारल्या. भारतीय असण्याविषयीची अमेरिकन माणसाची ओढ व त्यातून फूल इंडियन, हाफ इंडियन ते अगदी पाव इंडियन असे भारतीयत्व सांगण्याची तेथील माणसांची असोशी माडतांनाच आपला देश सुटतो पण परदेश आपला होतो का? हे माहीत नाही असा विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून ही अभिवाचनाची मैफल सरली. ड्रेसच्या खिशात शिल्लक राहिलेली अमेरिकेतील मिशीगन किना-यावरील पांढरी शुभ्र वाळू जरी अमेरिकन आठवणी जाग्या करत असली तरी इकडे परतल्यानंतर आपला देशच बरा अशी संवेदना अधिक तीव्रतेने जाणवते असे सांगत डॉ.मृण्मयी भजक यांनी अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करीत अमेरिकेची जिंदादील सफर घडविली. सुप्रसिध्द साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी अमेरिका खट्टी मीठी या पुस्तकाच्या बर्ल्बमध्ये म्हटल्याप्रमाणे हे आत्मकथन अमेरिकेकडे उत्सुकतेने पाहणा-या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटूंब कन्येचे आहे याची प्रचिती देणारा कार्यक्रम डॉ. मृण्मयी भजक यांनी सादर केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईmarathiमराठीUnited Statesअमेरिका