शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत अडकून पडले नवी मुंबईकर दाम्पत्य

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 2, 2026 04:44 IST

- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क  नवी मुंबई : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांना बसत आहे. ...

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांना बसत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी दुबई येथे गेलेले अनेक भारतीय अडकून पडले असून, त्यांमध्ये नवी मुंबईतील नवविवाहित दाम्पत्याचाही समावेश आहे.

नेरूळमध्ये राहणारे विजेंद्र म्हात्रे (३१) आणि पूनम (२६) लग्नानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहलीसाठी दुबईला गेले होते. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान दुबईतील पर्यटनाचा आनंद घेतला; मात्र परतीच्या दिवशी त्यांचा आनंद क्षणात चिंतेत बदलला. विमानतळावर पोहोचताच ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाल्याने सर्व उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आणि त्यांना परत हॉटेलमध्ये जावे लागले.

अनपेक्षित मुक्काम वाढल्याने म्हात्रे दाम्पत्यावर आर्थिक ताणही वाढला आहे. मुंबईला परतण्यासाठी त्यांनी वारंवार तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न केला; मात्र उड्डाणे रद्द झाल्याने पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरत  आहे. दरम्यान, दुबईत राहणारे नवी मुंबईकर हरीश गौडा यांनी सांगितले की, ‘परिस्थिती तणावपूर्ण असली तरी स्थानिक प्रशासन सतर्क आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षित आहेत.’

सतर्कतेचे आवाहनयुद्धाचे सावट वाढताच दुबई प्रशासनाने नागरिकांना मोबाइल संदेशाद्वारे सतर्क केले असून पुढील सूचना मिळेपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. दुबईत स्थायिक असलेले नवी मुंबईकर शहाजी माळी यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील अर्धसत्य व्हिडीओंमुळे भारतातील नातेवाइकांमध्ये अनावश्यक भीती पसरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbaikars stranded in Dubai due to Mideast tensions.

Web Summary : A Navi Mumbai couple is stranded in Dubai after flight cancellations due to regional tensions. Vijendra and Poonam Mhatre's honeymoon trip turned stressful. They face financial strain and are struggling to rebook flights. Local authorities advise caution.
टॅग्स :IranइराणDubaiदुबई