शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

Navi MumbaI: ऐतिहासिक बेलापूर किल्याचे सुशोभीकरण रखडले, संवर्धनाचे काम ठप्प, दोन वर्षाची होती मुदत

By नामदेव मोरे | Updated: December 3, 2023 12:36 IST

Navi Mumbai News: नवी मुंबईमधील एकमेव ऐतीहासीक ठेवा असलेल्या बेलापूर किल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने २०१९ मध्ये सुरू केले होते. दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु चार वर्षानंतरही काम पूर्ण झालेले नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई - नवी मुंबईमधील एकमेव ऐतीहासीक ठेवा असलेल्या बेलापूर किल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम सिडकोने २०१९ मध्ये सुरू केले होते. दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. परंतु चार वर्षानंतरही काम पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये सर्व काम ठप्प असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

खाडी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी १५६० मध्ये बेलापूर किल्ला बांधण्यात आला. १७३३ मध्ये चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. जवळपास ८४ वर्ष तो मराठा साम्राज्याचा भाग होता. साडेचारशे वर्षांची ऐतीहासी पार्श्वभुमी असलेल्या किल्याला पुर्वी पाच बुरूज होते. त्यापैकी तीन बुरूज पूर्णपणे नाहीसे झाले असून दोन बुरूजांचे अवशेष शिल्लक आहेत. या किल्याचे संवर्धन करावे यासाठी इतिहासप्रेमींनी वारंवार पाठपुरावा केला होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडको व शासनाकडे किल्ला संवर्धनासाठी पाठपुरावा केला होता. आमदारांच्या अभ्यासगटालाही पाहणीसाठी बोलावले होते. यानंतर सिडकोने किल्ला संवर्धनाचा निर्णय घेतला. १६ जून २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुशोभीकरणाचे काम सुरू झाले होते. यासाठी १८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते.

सिडकोने सुशोभीकरणाचे काम सुरू केल्यानंतर गडावर भिंतींचे बांधकाम पूर्ण केले आहे. एक वॉच टॉवरही बांधण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्यालयाबाहेरील बुरूजाचीही दुरूस्ती केली होती. परंतु काही नागरिकांनी बुरूजाला सिमेंट वापरण्यास हरकत घेतली. पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याच्या नियमावलीप्रमाणे संवर्धन व्हावे अशी भुमीका घेतली. यानंतर विविध कारणांनी संवर्धन व सुशोभीकरणाचे काम बंद झाले आहे. दोन वर्षामध्ये काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण चार वर्षानंतरही ते पूर्ण झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम पूर्णपणे ठप्प असून ते पुन्हा सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दोन हेक्टर परिसराचे सुशोभीकरणबेलापूर किल्यावरील ऐतीहासीक बुरूजाचे संवर्धन करून दोन हेक्टर परिसराचे निसर्ग पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले जाणार होते. परंतु प्रत्यक्षात संरक्षण भिंतींच्या उभारणीव्यतिरिक्त इतर कोणतेच काम पूर्ण झालेले नाही.चौकट

पुढील कामे होती प्रस्तावीतबेलापूर किल्ला परिसराचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर केले जाणार होते. या ठिकाणी ॲम्फी थिएटर, फूड कोर्ट, टेहळणी बुरूज, पार्किंग, सुसज्ज आसनव्यवस्था, विरंगुळा केंद्र, ऑडीओ व्हिडीओ व चित्र रूपाने किल्याचा इतिहास सांगणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई