शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

नवी मुंबई विमानतळाला आता जेएनपीटीतून मिळणार जेट इंधन

By नारायण जाधव | Updated: June 26, 2024 06:39 IST

२२ किमीची भूमिगत पाइपलाइन टाकणार : सीआरझेडची मंजुरी

नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा चंग विकासक अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी आणि सिडकोने बांधला असून त्या दृष्टीने विमानतळावरील विकासकामांनी वेग घेतला आहे.

यानुसारच विमानतळावर ये-जा करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जेट विमानांना लागणाऱ्या इंधनासाठी जवाहरलाल नेहरू बंदरातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते विमानतळापर्यंत २२ किमीची भूमिगत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. तिला सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी देऊन हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

- धावपट्टी, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसह टर्मिनल बिल्डिंगच्या कामांनी वेग घेतला आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबईसह पनवेल आणि पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी विविध रस्ते, उड्डाणपूल आणि सागरी मार्गाची कामे जोमाने सुरू आहेत. - या कामांबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानांना लागणाऱ्या हजारो लीटर जेट इंधनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकासक अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी आणि सिडकोने कंबर कसली आहे.- जेएनपीटीतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे ३ स्टेशन ते विमानतळापर्यंत २२ किमीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते विमानतळापर्यंत २१.७ किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने ४ जूनच्या सीआरझेड मंजुरी दिली.

अशी असेल जेट इंधन पाइपलाइनही पाइपलाइन २१.७ किमी राहणार असून ती जमिनीखाली १.२ मीटर खोलवर भूमिगत राहणार आहे. ती १४ डायमीटर बाय ०.२८१ जाडीची राहणार आहे. इंधन गळतीसह इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी या पाइपलाइनला स्कॉडा प्रणाली आणि कॅथोडिक प्रोटेक्शन सिस्टीम राहणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ