शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शिवसेना नरमली, नवी मुंबई विमानतळास दिबांचेच नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:28 IST

मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याची प्रकल्पग्रस्तांची माहिती...

नवी मुंबई/पनवेल : एकनाथ शिंदेंसह ३८ आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासोपानाच्या लढाईत पिछाडीवर पडलेली शिवसेना अखेर नरमली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पाठिंबा दर्शविला आहे.आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कधीही स्वत:च्या नावासाठी  आग्रही नव्हते. यामुळे नवी मुंबई विमानतळाबाबत वाद असेल, तर हा विषय संपवा, अशी सूचना मी तत्कालीन  मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती, मात्र ते ऐकायला तयार नव्हते, मला विश्वासात न घेताच त्यांनी सिडकोत ठराव घेतला. सभागृहात तो घेतला नव्हता. आता लवकरच विधिमंडळाच्या सभागृहात ठराव घेऊन  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे  प्रकल्पग्रस्तांनी  बैठकीनंतर सांगितले.नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले. गेल्या शुक्रवारीही दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोवर प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला होता. बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव  द्यावे, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली हाेती, परंतु शिंदे यांच्या बंडातील हवा काढण्यासाठी आणि नवी मुंबई,  रायगडमधील प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनीच हा वाद सोडवून दि. बा. पाटील यांच्या नावास संमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

भाजप नेत्यांना टाळलेसर्वपक्षीय कृती समितीत सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला, तरी मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार गणेश नाईक, आमदार  मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांच्यासह एकही  भाजप नेता उपस्थित नव्हता. हे नेते स्वत:हून गेले नाहीत, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना टाळले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

यांची होती बैठकीला उपस्थितीबैठकीस आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघ शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांच्यासह संजय तरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, काँग्रेसचे महेंद्र घरत, अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना